Arvind Kejriwal | “…म्हणून पंतप्रधान शिकलेला असावा, अडाणी नको”; नोटबंदीवर अरविंद केजरीवाल यांची मोदींवर टीका
Arvind Kejriwal | नवी दिल्ली : काल (19 मे) रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) 2 हजाराच्या नोटेबाबत एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामध्ये म्हटलं आहे की, आता चलनातून दोन हजार रुपयांची नोट काढण्यात येणार असून ती नोट 30 सप्टेंबर 2023 पर्यंत बँकेतून बदलून घेता येणार आहेत. त्यानंतर ती चलनात वापरता येणार नाही. RBI च्या या निर्णयानंतर अनेक प्रतिक्रिया येत आहे. तर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी ट्विट करत नरेंद्र मोदींवर ( Narendra Modi ) टीका केली आहे.
काय म्हणाले अरविंद केजरीवाल ( What did Arvind Kejriwal say)
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, “आधी ते म्हणतात , दोन हजारांच्या नोटेमुळे भ्रष्टाचार संपेल. म्हणून चलनात 2 हजाराची नोट आणली. परंतु आता ते म्हणत आहेत की, दोन हजारांची नोट बंद केल्याने भ्रष्टाचार संपेल. म्हणून यासाठी आम्ही म्हणतोय की, पंतप्रधान शिकला-सवरलेला असावा. एका अडाणी पंतप्रधानाला कुणीही काहीही सांगतं त्याला काहीही सजमत नाही. याचा त्रास फक्त जनतेला सहन करावा लागतो”. अशा शब्दात केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे.
पहले बोले 2000 का नोट लाने से भ्रष्टाचार बंद होगा। अब बोल रहे हैं 2000 का नोट बंद करने से भ्रष्टाचार ख़त्म होगा
इसीलिए हम कहते हैं, PM पढ़ा लिखा होना चाहिए। एक अनपढ़ पीएम को कोई कुछ भी बोल जाता है। उसे समझ आता नहीं है। भुगतना जनता को पड़ता है।
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) May 19, 2023
दरम्यान, 2016 मध्ये देखील नोटबंदी बाबत महत्वाचे निर्णय घेण्यात आले होते. त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 500 आणि 1000 च्या नोटा चलनातून बंद केल्या होत्या. त्यांच्या जागी नवीन 500 आणि 2000 च्या नोटा बाजारात आणण्यात आल्या होत्या. त्यानंतर नोव्हेंबर 2016 मध्ये 2 हजार रुपयांची नोट बाजारात पाहायला मिळाली. तसचं RBI ने दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटलं आहे की, 2019 पासूनच 2 हजारांच्या नोटांची छपाई बंद केली आहे. यामुळे आता नागरिकांना देखील याबाबत जागृत राहून आपल्याकडील 2 हजारांच्या नोटा बदलून घ्याव्या लागणार आहेत.
महत्वाच्या बातम्या-
- Samana Editorial | “खोक्यांच्या बदल्यात सरकार स्थापन…”; सामना अग्रलेखाच्या माध्यमातून राज्य सरकारवर हल्लाबोल
- Weather Update | पुढील तीन दिवस वाढणार उन्हाच्या झळा, हवामान खात्याने व्यक्त केला अंदाज
- RBI ने चलनातून 2,000 रुपयांच्या नोटा काढून टाकल्या
- Patanjali Toothpaste | रामदेव यांच्या पतंजलीकडून लोकांची फसणूक; शाकाहारी असल्याचे सांगून विकतात मांसाहारी उत्पादने
- Ajit Pawar | “राज्यात सर्व जाती-धर्माचे लोक…”; त्र्यंबकेश्वर प्रकरणावर अजित पवारांची प्रतिक्रिया
Original NEWS SOURCE – https://bit.ly/41TiYLJ
Comments are closed.