“काँग्रेसचा कचरा आम्हाला पक्षात घ्यायचा नाही, नाहीतर संध्याकाळपर्यंत…”; अरविंद केजरीवालांची टीका

अमृतसर : देशात सध्या आगामी येणाऱ्या पंजाब विधानसभा निवडणुकीच्या चर्चा सुरु आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी पंजाबमध्ये मोठा राजकीय भूकंप घडून आला होता. यानंतर आता या निवडणुकांमध्ये सर्वच राजकीय पक्ष प्रचाराला लागले आहेत. यावरूनच काँग्रेसचे २५ आमदार पक्ष सोडायच्या तयारीत आहेत, असे सूचित करताना आम आदमी पक्षाचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी टोमणा मारला.

तसेच पुढे केजरीवाल महाले कि, काँग्रेसचा कचरा आम्हाला घ्यायचा नाही, नाही तर संध्याकाळपर्यंत काँग्रेसचे २५ आमदार आम आदमी पक्षात सामील होतील! “प्रत्येक पक्षात असे घडते की, ज्यांना तिकीट मिळत नाही, ते नाराज होतात. त्यांचे मन वळवण्याचा प्रयत्न केला जातो, काही लोक सहमत असतात तर काही नाराज होतात. काँग्रेसमधीलही अनेक लोक आमच्या संपर्कात आहेत.

पण त्यांचा कचरा आम्हाला उचलायचा नाही, जर आम्ही त्यांचा कचरा उचलू लागलो, तर आज संध्याकाळपर्यंत काँग्रेसचे २५ आमदार आमच्या पक्षात येतील. ही स्पर्धा करायची झाली तर आपल्यापैकी फक्त २ जण त्या पक्षात गेले आहेत. मी त्यांना आव्हान देत आहे,२५ आमदार आणि २-३ खासदार आमच्या संपर्कात आहेत, त्यांना आपमध्ये यायचे आहे,” असे अरविंद केजरीवाल म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

 

 

 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा