Arvind Sawant | “इतका छळवाद झाला तेव्हा राज ठाकरे गप्प होते, आता…”; अरविंद सावंत यांचा सवाल

मुंबई : अंधेरी (पूर्व) पोटनिवडणुकीवरून अनेक घडामोडी घडत आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांनी देखील उमेदवारी अर्ज भरलाय. तर दुसरीकडे भाजप आणि शिंदे गटाकडून मुरजी पटेल यांनी अर्ज भरला आहे. त्यामुळे सगळ्यांचेच लक्ष पोटनिवडणुकीकडे आहे. अशातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं आहे. त्यामध्ये राज यांनी भारतीय जनता पक्षानं पोटनिवडणूक लढवू नये, अशी विनंती केली आहे. राज ठाकरे यांच्या पत्रावर उद्धव ठाकरे गटाचे अरविंद सावंत यांनी भाष्य केलं आहे.

अरविंद सावंत यांची प्रतिक्रिया 

भाजपा माणुसकीहीन, संवेदनाहीन, संस्कृतीहीन पक्ष आहे. इतका छळवाद झाला तेंव्हा राज ठाकरे गप्प होते. आता फॉर्म भरुन झाला आहे, भूमिका व्यक्त करण्यास उशीर परंतु एक संवेदनशीलता दाखवली त्याबद्दल आभार, असं अरविंद सावंत यांनी म्हटलं आहे. यासंदर्भात अरविंद सावंत यांनी आपल्या ट्विटर आकाऊंटवरून एक ट्विट केलं आहे.

तसेच, अरविंद सावंत यांनी एक व्हिडीओही शेअर केला आहे. त्यामध्ये ही खरी महाराष्ट्राची संस्कृती आहे. पण उशीर झाला आहे. देर आए दुरुस्त आए असं म्हणता येईल, ते त्यांच्या व्यक्तीपुरतं म्हणता येईल. पण प्रत्यक्षात काय घडलं? निवडणूक आयोगाकडे जेव्हा शिवसेना नाव आणि चिन्हाच्या संदर्भात वाद घातला. तेव्हा या शिंदे गटाने काय म्हटलं की धनुष्यबाणाचा गैरवापर होईल आणि म्हणून ते गोठवावं. ते चिन्ह गोठवावं, आम्हाला द्यावं किंवा नाव गोठवावं पण ते निवडणूक लढत आहेत का? खोटेपणा तिथे केला, किती खोटारडी माणसं आहेत. त्यांच्या प्रत्येक नेत्यांचं विधान हे कायम खोटं असणार आणि होतं. त्यांचं हे सरळसरळ समोर दिसलेलं, अनुभवलेलं उदाहरण आहे, असं म्हटलं आहे.

पुढेही ते म्हणाले की, वढं करून ते थांबले का? ते थांबले नाही. तर ऋुतुजा लटके यांचा राजीनामा मंजुर करताना जे गलिच्छ राजकारण खेळलं गेलं, जो दबाव मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी टाकला. त्यांनी कितीही जरी सांगितलं, की आमचा दबाव नव्हता. तर मी उलट प्रश्न विचारतो की मग राजीनामा मंजुर करण्याचे आदेश का नाही दिले? तुमचा दबाव होताच होता. दुर्दैवाने अधिकारी गुलामासारखे वागले. त्यांनी मुंबई महापालिकेला कलंक लावला, लांच्छन लावलं. इतका छळवाद जेव्हा झाला तेव्हा राज ठाकरे गप्प होते आणि आता त्यांनी हे जेव्हा हे सांगितलं तेव्हा अर्ज वैगरे भरून झालेला आहे. प्रचाराला सुरुवात झालेली आहे. कदाचित लक्षात आलं असेल की पराभव होईल, म्हणून त्यांनीच यांना नाही ना सांगितलं, की तुम्ही असं एक पत्र द्या आम्हाला. आम्हाला थेट माघार घेता येणार नाही. मग राज ठाकरेंच्या शब्दाला मान देऊन आम्ही माघार घेतली असं दाखवायचं असेल. ही पळवाट आहे, पण दुर्दैव आहे.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.