Arvind Sawant | “टिळक म्हणाले होते सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का? आता..”; अरविंद सावंतांचा शिंदे-फडणवीस सरकारवर हल्ला

Arvind Sawant | मुंबई : महाराष्ट्र राज्यातील राजकीय वातावरण सध्या चांगलंच तापलेलं आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षनेत्यांमध्ये सतत आरोप, टीकांचा खेळ हा सुरूच असतो. एकीकडे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गट आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गट असं चित्र आहे. तर दुसरीकडे ठाकरे गट आणि भाजप (BJP) अशातच ठाकरे गटाचे नेते अरविंद सावंत (Arvind Sawant) यांनी यावेळी राज्य सरकावर (शिंदे-फडणवीस सरकार) जोरदार हल्ला केला आहे.

काय म्हणाले अरविंदे सावंत (Arvind Sawant)

इंग्रजांच्या विरोधात पूर्वी लोकमान्य टिळक (Lokmanya Tilak) म्हणाले होते की सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का?. आत्ता तसं काही म्हटलं तर ताबडतोब देशद्रोह होईल, असं म्हणत अरविंद सावंत यांनी शिंदे-फडणवीस सरकारला फटकालं आहे. प्रसार माध्यमांशी सावंत संवाद साधत होते. त्यावेळी ते बोलत होते. ज्या पद्धतीने गुन्हे दाखल होतायत, ते पाहाता व्यंगचित्रकार, नकलाकार जन्माला आलेच नसते. जाणीवपूर्वक शिवसेनेच्या लोकांवर ‘चुन चुन के केस दाखिल करेंगे’, असं सध्या चालू आहे. त्यांना वाटतंय की आम्ही दबावात येऊन एक तर त्यांच्या गटात जाऊ किंवा गप्प बसू. त्यांनी अजून ओळखलं नाहीये. शिवसेनेचा चेंडू जितका जोरात आपटाल, तेवढा तो जोरात उसळून वर येतो. त्यामुळे या सगळ्याचं आम्हाला भय वाटत नसल्याचं अरविंद सावंतांनी सांगितलं.

दिवाळीत फटाके वाजतात. तसे हे वाजतायत. काही लवंगी असतात, काही बार असतात.सोडून द्यायचं. उद्धव ठाकरेंचं मला खरंच आश्चर्य वाटतं. जेव्हा हे सगळं सुरू झालं, जेव्हा कोर्ट-कचेऱ्या सुरू झाल्या तेव्हा त्यांचं पहिलं वाक्य होतं की, ‘देशातली लोकशाही जिवंत राहील की नाही हा प्रश्न आहे’. आंबेडकरांनी दिलेल्या संविधानावर रोज घाव घातला जातोय. अभिव्यक्ती स्वातंत्र, लेखनाचं स्वातंत्र्य आहे. त्याचा आम्ही वापर करत असू, तर त्यात गैर काय केलं हे सांगता आलं पाहिजे.

तसेच सावंत पुढे बोलताना म्हणाले, सीबीआयला अनेक राज्यांनी दार बंद केलं आहे. सर्वोच्च न्यायालयानंच तेव्हा म्हटलं होतं की सीबीआय म्हणजे सरकारचा पिंजऱ्यातला पोपट आहे. ईडी, निवडणूक आयोग हे सगळे पोपटच आहेत. केंद्रातली दोन माणसं या पिंजऱ्यातल्या पोपटांना खाऊ घालतात, दम देतात, भय घालतात. या यंत्रणांमधल्या अधिकाऱ्यांच्या मनालाही हे पटतं की नाही, असा मला प्रश्न पडतो.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.