Arvind Sawant | बाळासाहेबांना आदरांजली अर्पण करत अरविंद सावंतांची विरोधकांवर टीका; म्हणाले, “शिवसेनेच्या पाठीत खंजीर…”

Arvind Sawant | मुंबई : आज 23 जानेवारी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे. बाळासाहेबांना विविध राजकीय पक्ष आणि नेत्यांकडून अभिवादन केले जात आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे नेते अरविंद सावंत (Arvind Sawant) यांनी देखील ट्विट करत बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली अर्पण केली आहे. यावेळी अरविंद सावंत यांनी शिंदे गटावर देखील निशाणा साधला आहे.

ट्विटमध्ये अरविंद सावंत म्हणतात, “वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांना विनम्र अभिवादन…! करण्या अवतार कार्य चंद्र सूर्य ताऱ्यांनो, वादळी वाऱ्यांनो,महाराष्ट्राभिमानी राष्ट्राभिमानी सैनिकांनो, व्हा प्रतिबद्द, घ्या शपथ ! ”

याचबरोबर,छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांना अवमानीत करणाऱ्यांना, डॉ. बाबासाहेबांच्या संविधांनावर हल्ले करणाऱ्या मतीभ्रष्टांना, शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्या गद्दारांना, राष्ट्र आणि महाराष्ट्राच्या एकतेला सुरूंग लावणाऱ्यांना, प्रबोधनकार आणि वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरेंच्या विचार, आचारांचा खरा वारसा जपण्या, मराठी भाषा, मराठी संस्कृती, मराठी अस्मिता आणि स्वाभिमान जपण्या, राष्ट्रधर्म सोडून जातीपाती, प्रांती, धर्मा धर्मात तेढ निर्माण करणाऱ्या या राष्ट्र आणि महाराष्ट्रद्रोह्यांना नेस्तनाबूत करण्या, उचला बेल भंडार ! म्हणा, उदो उदो ग अंबाबाई साहेब हीच आमची आपणास ग्वाही…!!!” असं म्हणत अरविंद सावंत यांनी बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केले आहे.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed.