Arvind Sawant | “महाराष्ट्रासाठी घोषणा होत आहेत म्हणजे…”; अरविंद सावंतांनी वर्तवलं भाकित
मुंबई : महाराष्ट्रातून एकापाठोपाठ प्रकल्प बाहेर चालले आहे. आधी वेदांता-फॉक्सकॉन (Vedant Foxcon) आणि नागपूरमध्ये होणारा C- 295 लष्करी ट्रान्सफोर्ट एअरक्राफ्ट प्रकल्प आता गुजरातमधील वडोदऱ्याला होणार आहे. या सगळ्यामुळे राज्यातील वातावरण खूपच खराब झालं आहे. विरोधी पक्षनेत्यांकडून राज्य सरकारवर टीका करण्यात येत आहेत. अशातच केंद्र सरकारने महाराष्ट्रात दोन लाख कोटींचे प्रकल्प मंजूर केल्याची घोषणा नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी केली आहे. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे नेते अरविंद सावंत (Arvind Sawant) यांनी भाष्य केलं आहे.
काय म्हणाले अरविंद सावंत (Arvind Sawant)
महाराष्ट्राचा विकास करणारे सर्व प्रकल्प गुजरातला पळवले. त्याबाबत घोषणा करताच गुजरातची निवडणूक लागली. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातदेखील प्रकल्पांबाबत घोषणा होत आहेत. त्यामुळे कदाचित महाराष्ट्रातही विधानसभेची निवडणूक लागेल, असं भाकीत अरविंद सावंत यांनी केलं आहे.अरविंद सावंत यांनी पत्रकार परिषद घेतली होती. त्यावेळी ते बोलत होते.
गुजरातचे प्रकल्प पळवायचे थांबले, कारण निवडणूक जाहीर झाली. आता महाराष्ट्राला प्रलोभण देण्याचं काम सुरु आहे” असा आरोप सावंत यांनी केला आहे. राज्यात घोषणांचा सुकाळ आणि अंमलबजावणीचा दुष्काळ असल्याचा हल्लाबोलही त्यांनी केला आहे. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतात जाऊन घाम गाळला. हे सर्व ते प्रसिद्धीसाठी करत असल्याचंही सावंत यांनी म्हटलं आहे. पुढे बोलताना अरविंद सावंत म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी शेतात काम केलं. स्ट्रॉबेरीचा विषय मांडला. मात्र, आज महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं काळीज फाटलं आहे. आत्महत्या होत आहेत. त्यांनी या शेतकऱ्यांना मदत करणं सोडलं आणि प्रसिद्धीसाठी हे सर्व सुरू केलं.
दरम्यान, महाराष्ट्रात दोन लाख कोटींपेक्षा जास्त 225 प्रकल्प मंजूर करण्यात आले आहेत, अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे. महाराष्ट्रात रेल्वेसाठी 75 हजार कोटी आणि रस्ते विकास प्रकल्पासाठी 50 हजार कोटींचा निधी देण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Devendra Fadnavis | ‘विरोधक कधीही एकत्र आले तरीही…’; देवेंद्र फडणवीसांचा दावा
- Nana Patole | महाविकास आघाडीवर बोलताना नाना पटोलेंचे मोठे विधान, म्हणाले…
- Amruta Fadnavis | ‘आधी कुंकू लाव, मगच बोलतो’, संभाजी भिडेंच्या विधानावर अमृता फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाल्या…
- Devendra Fadanvis । “ते कोणाची चाकरी करतात हे सर्वांना माहिती आहे”; जयंत पाटलांच्या ‘त्या’ वक्तव्यावर फडणवीसांचा पलटवार
- Sushma Andhare | बच्चू कडू-राणा वादावर सुषमा अंधारे म्हणाल्या, “बच्चू कडूंची कारकीर्द…”
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.