Arvind Sawant | सरकारकडून सातत्याने कायद्याचं उल्लंघन होतंय – अरविंद सावंत

मुंबई : एकनाथ शिंदे गट आणि शिवसेनेमधील वाद आता टोकाला गेलायं. सुप्रीम कोर्टात आज एकनाथ शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे गटातील शिवसेना यांच्यातील परस्पर पाच महत्त्वाच्या याचिकांवर सुनावणी झालीयं.  एकनाथ शिंदे गट आणि शिवसेनेमधील वादावरती संपूर्ण देशाचे लक्ष आहे. कोर्टामधील सुनावणीवर शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी आता मोठे भाष्य केले आहे.

अरविंद सावंत मिडियाला बोलताना म्हणाले की, एकनाथ शिंदे गटाच्या वकिलांनी कोणताच विषय संविधानात्मक मांडलेला नाहीयं, कायद्याचाही कुठलाही उल्लेख त्यांनी यावेळी केलेला नाहीयं. ते फक्त सातत्याने लाॅजिक मांडत होते…पण हे लक्षात घेणे महत्वाचे आहे की, लाॅजिक चालणार नाहीयं कायदा चालणार आहे. म्हणून न्यायालयाने त्यांच्यावरती ताशेरे ओढले. कोर्टाने त्यांना सांगितले की, आम्ही तुम्हाला 10 दिवस दिले, त्या 10 दिवसात तुम्ही काय केले? मग आता तुम्ही बोलूही नका सरळ निवेदन द्या आणि ते निवेदन आज दिले आहे, असे अरविंद सावंत म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या :

महत्वाच्या बातम्या

Comments are closed.