Arvind Sawant । ते तर बावन’खुळे’, फार खळखळाट करू नका; अरविंद सावंत यांचा पलटवार

Arvind Sawant | मुंबई : ११ ऑक्टोबर रोजी भंडारा येथे भाजपाचा ( BJP) कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला मार्गदर्शन करण्याकरिता बावनकुळे हे भंडारा येथे आले असताना त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केवळ मुख्यमंत्रीपदाची खुर्ची मिळवण्यासाठी हिंदुत्वाचा मुद्दा सोडून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचा हात हातात घेतला. उद्धव ठाकरे यांना मिळालेली मशाल हे चिन्ह आता काँग्रेसच्या हातात आहे, अशी घणाघाती टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांनी ठाकरेंवर केली होती. यावर आता शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी बावनकुळे यांना प्रत्युत्तर दिल आहे.

अरविंद सावंत यांचं प्रत्युत्तर

मशालीवर टीका करणारे हे बावनखुळे आहेत. त्यांचा खुळखुळाट आणि खळखळाट फार काळ टिकणार नाही, असा हल्लाबोल अरविंद सावंत ( Arvind Sawant ) यांनी केला आहे. उभ्या महाराष्ट्रात विचारांची मशाल पेटली आहे, आचारांची पेटली आहे. राजकीयदृष्ट्या मशाल पेटवणं ठिक आहे. पण ती मनात आहे. त्यामुळे जे उद्धव बाळासाहेब ठाकरे शस्र हातात घेतील ते मराठी माणसाच्या हातातील शस्त्र आहे. मशाल मनात रुजवली गेली आहे, असं अरविंद सावंत म्हणाले.

कोणीतरी म्हणालं अरबी समुद्राचं पाणी आणू आणि मशाल विझवू ते सुळे आहेत की खुळे आहेत मला माहिती नाही. असे हे बावन’खुळे’ त्यांनी खुळखुळाट करू नये आणि खळखळाट पण करु नका. मशाल अशी विझत नाही रे. अग्नीवर पाणी टाकाल, मनातल्या मशालीवर पाणी कसं टाकाल? असा सवाल त्यांनी केला.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.