Arvind Sawant | “स्वत:च्या दिव्याखाली अंधार आहे तो…”; दीपक केसरकरांच्या ‘त्या’ वक्तव्याचा अरविंद सावंतांकडून समाचार 

Arvind Sawant | मुंबई : डाव्होस दौऱ्यासाठी मुख्यमंत्र्यांचं कमर्शियल विमानाचं तिकीट बूक करण्यात आलं होतं. मात्र, लवकर पोहोचावं यासाठी ते चार्टर्ड विमानाने गेले. अशातच तांत्रिक कारणांमुळे त्यांना डाव्होसला पोहोचण्यात उशीर झाला. यावरून माजी मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली.

यावर भाष्य करताना शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी आदित्य ठाकरे यांना वयामुळे अनुभव नाही, अशी खोचक टीका केली. केसरकारांच्या या टीकेवर ठाकरे गटातील नेते अरविंद सावंत यांनी पलटवार केला आहे.”दीपक केसरकर यांनी आदित्य ठाकरे यांच्या अनुभवाविषयी वक्तव्य करताना त्यांच्या दिव्याखाली जो अंधार आहे, तो बघायला हवा होता”, असा घणाघात अरविंद सावंत (Arvind Sawant) यांनी केलाय.

पुढे ते म्हणाले, “त्यांच्यासोबत असणाऱ्या कित्येक आमदारांची, खासदारांची मुलं काय करत आहेत, ते पाहावे. ते अल्पवयात, काहीही अनुभव नसताना थेट आमदार, खासदार झाले आहेत. त्यांनी पक्षात कधीही काम केलेले नाही. आदित्य ठाकरे यांच्याबाबतीत हे उलटे आहे. आदित्य ठाकरे यांनी पक्षात काम केलेले आहे. त्यांनी युवकांचे प्रश्न सोडवलेले आहेत.”

काय म्हणाले होते दीपक केसरकर?

“आदित्य ठाकरेंना वयामुळे अनुभव नाही, हे आम्ही समजू शकतो. म्हणून रोज काही तरी बोलायचं आणि स्वत:चं हसं करून घ्यायचं, हे योग्य नाही. आदित्य ठाकरेंनी उद्धव ठाकरेंशी बोलावं, खात्री करून घ्यावी. जगभरातील लोक डाव्होसमध्ये चार्टर्ड विमानानेच येतात. चार्टर्ड विमानाने प्रवास केला म्हणजे फार मोठा गुन्हा केला, असं होत नाही. यापूर्वी अनेक मुख्यमंत्र्यांनी चार्टर्ड विमानाने प्रवास केला आहे. त्यामुळे आदित्य ठाकरेंचे आरोप हास्यास्पद आहेत.”

महत्वाच्या बातम्या :