Aryan Khan & Nora Fatehi | आर्यन खान करतोय नोरा फतेहीला डेट? फोटो झाले व्हायरल

Aryan Khan & Nora Fatehi | दुबई: बॉलीवूड किंग खान शाहरुख खान (Shah Rukh Khan) चा मुलगा आर्यन खान (Aryan Khan) सध्या चर्चेचे कारण बनला आहे. बॉलीवूडमध्ये एकीकडे किंग खानच्या ‘पठाण’ चित्रपटामुळे वादविवाद निर्माण झालेला आहे. तर दुसरीकडे किंग खानचा मुलागा आणि नोरा फतेही (Nora Fatehi) डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. आर्यन खान आणि नोरा फतेही यांचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, आर्यन खान आणि नोरा फतेही एकमेकांना डेट करत आहे. सोशल मीडियावर या दोघांच्या पार्टीचे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या दोघांचेही फोटो बघून त्यांच्या अफेअरच्या चर्चांना सोशल मीडियावर उधाण आलं आहे. कारण आर्यन आणि नोराच्या कॉमन मित्राद्वारे त्यांचे फोटो शेअर करण्यात आले आहे. त्याच्या या फोटोमध्ये दोघेही स्पॉट झाले आहे.

फातिमा राजा या मैत्रिणीने नोरा फतेही आणि आर्यन खानच्या दुबईतील पार्टीचे फोटो शेअर केले आहे. या फोटोवरून ते दोघे एकमेकांना डेट करत असल्याचा अंदाज नेटकरी लावत आहे. त्यांच्या या फोटोवर नेटकरी मजेशीर कमेंट देखील करत आहे.

बॉलीवूड किंग खान शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान बॉलीवूडमध्ये पदार्पणासाठी सुसज्ज आहे. तो लवकरच बॉलीवूड मध्ये त्याच्या करिअरला सुरुवात करणार आहे. दिग्दर्शकाच्या भूमिकेसह तो बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार आहे.

महत्वाच्या बातम्या