आर्यन खानने तुरुंगातील लायब्ररीतून घेतली ‘ही’ दोन पुस्तक

मुंबई : क्रुझवरील अमलीपदार्थांच्या पार्टीप्रकरणी अटकेत असलेला अभिनेता शाहरूख खान याचा मुलगा आर्यन खान जवळपास गेल्या १९ दिवसांपासून तुरुंगात आहे. दरम्यान तुरुंगात वेळ घालवण्यासाठी आर्यनने पुस्तकांचा वापर करत असल्याचे म्हटले जात आहे.

रिपोर्टनुसार, आर्यनने तुरुंगातील लायब्ररीमधून दोन पुस्तक घेतली आहेत. ज्यात एक ‘Golden Lion’ आणि दुसरं राम आणि सीता यांच्या कहाणीवर आधारीत पुस्तक देण्यात आलं आहे.

आर्यन खानच्या व्हाटस्अप चॅटमधून मिळालेल्या माहितीच्या आधारावर त्याचा जामीन फेटाळण्यात आला आहे. आर्यन आणि अन्य दोन आरोपींचा गुन्ह्यातील सहभाग सकृतदर्शनी गंभीर आहे. त्यामुळे जामिनावर असताना तो अशा प्रकारचा गुन्हा पुन्हा करणार नाही हे म्हणता येऊ शकत नाही, शिवाय एनसीबीने प्रकरणाशी संबंधित सादर केलेली कागदपत्रे आणि आर्यन, अरबाज यांनी त्यांना ताब्यात घेतल्यानंतर स्वेच्छेने दिलेल्या जबाबानुसार त्यांनी सेवनासाठी अमलीपदार्थ बाळगल्याचे कबूल केले होते. यावरून अरबाजच्या बुटातून हस्तगत केलेल्या अमलीपदार्थाबाबत त्याला माहिती होती हेच स्पष्ट होते. या बाबी लक्षात घेता आरोपींना जामीन देता येणार नसल्याचे न्यायालयाने म्हटले.

महत्वाच्या बातम्या

 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा