‘आर्यन क्रुझवर उपस्थित नव्हताच’; आर्यन खान प्रकरणाला नवीन वळणं

मुंबई : बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान सध्या ड्रग्ज प्रकरणी आर्थर रोड जेलमध्ये आहे. या प्रकरणानंतर राज्यासह देशातील वातावरण प्रचंड तापलेलं आहे. दरम्यान आर्यन खान प्रकरणात आर्यन खानचे वकील अमित देसाई यांनी खळबळजनक वक्तव्य केलं आहे.

आर्यन खानच्या याचिकेवर काल न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी आर्यन खानकडून निष्णात वकील अमित देसाई यांनी बाजू मांडली आहे. आर्यन खानकडं काहीच सापडल नाही, जो त्या क्रुझवर देखील उपस्थित नव्हता. त्या मुलावर ड्रग्ज तस्करीचं आरोप करणं हास्यास्पद असल्याचं देसाई न्यायालयात म्हणाले आहेत.

दरम्यान, आर्यन खानकडून न्यायालयात अगोदर प्रसिद्ध वकील सचिन मानेशिंदे बाजू मांडत होते. तर आज अमित देसाई यांनी बाजू मांडली आहे. आर्यन खान प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे होत आहेत. या प्रकरणानं राज्यात खळबळ उडाली आहे.

महत्वाच्या बातम्या

 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा