‘त्या रात्री आर्यन क्रुझवर उपस्थित नव्हताच’; आर्यनच्या वकिलांचा खळबळजनक दावा

मुंबई : कॉर्टेलिया क्रुझवर एनसीबीनं छापा टाकून अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याच्यासह 8 जणांना अटक केली. यानंतर आर्यनच्या अरेस्ट मेमोमध्ये याचा संपूर्ण तपशील देण्यात आला आहे.विशेष म्हणजे आर्यनने स्वत: आपल्या लेन्सच्या डब्ब्यातून ड्रग्ज नेल्याची कबुली दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या घटनेनंतर सर्वच स्तरातून यावर विविध प्रतिक्रिया येत आहेत.

या घटनेनंतर बॉलिवूडमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. आर्यनच्या अरेस्ट मेमोमध्ये याचा संपूर्ण तपशील देण्यात आला आहे. विशेष म्हणजे आर्यनने स्वत: आपल्या लेन्सच्या डब्ब्यातून ड्रग्ज नेल्याची कबुली दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आर्यन खानसह अन्य जणांना 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावलेली आहे. या प्रकरणात आर्यन खानचे वकील अमित देसाई यांनी खळबळजनक वक्तव्य केलं आहे.

या प्रकरणात काल न्यायालयात सुनावणी पार पडली. यावेळी आर्यन खानकडून निष्णात वकील अमित देसाई यांनी बाजू मांडली आहे. आर्यन खानकडं कसल्याही प्रकारचं ड्रग्ज सापडलं नाही. तरी एनसीबीची आर्यन खानवरची कारवाई हास्यास्पद असल्याचं अमित देसाई यांनी म्हटलं आहे. ज्याच्याकडं काहीच सापडल नाही, जो त्या क्रुझवर देखील उपस्थित नव्हता. त्या मुलावर ड्रग्ज तस्करीचं आरोप करणं हास्यास्पद असल्याचं देसाई न्यायालयात म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या

 

 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा