पती म्हणून राखी सावंतने उभं केलं ‘बिग बॉस १५’च्या कॅमेरामनला?

मुंबई : काही दिवसांपूर्वी ‘बिग बॉस १५’मध्ये ‘ड्रामा क्वीन’ राखी सावंतने एण्ट्री केली. विशेष म्हणजे यावेळी राखीसोबत तिचा पती रितेशसुद्धा बिग बॉसच्या घरात आला. मात्र आता हा रितेश राखी सावंतचा खरा पती नसल्याचं म्हटलं जात आहे. वृत्तानुसार रितेश हा बिग बॉस १५च्या सेटवरील कॅमेरामन आहे. त्यामुळे राखीने पुन्हा एकदा प्रेक्षकांना फसवल्याचं कळतंय.

“माझं खरंच लग्न झालं आहे आणि अखेर हे जग माझ्या पतीला पाहणार आहे. बिग बॉसच्या घरात मी रितेशसोबत एण्ट्री करणार आहे”, असं राखी सावंत म्हणाली होती. मात्र टीआरपीसाठी बिग बॉसच्या टीमने आणि राखीने मिळून कॅमेरामनला पती म्हणून उभं केल्याचं म्हटलं जात आहे.

दरम्यान राखीने स्वत:च्या लग्नाची अफवा पसरवल्याचा तिच्यावर आरोप झाला होता. या आरोपांवर उत्तर देत ती म्हणाली होती, “रितेश या व्यावसायिकासोबत मी लग्न केलंय असं सांगितलं तेव्हा लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवला नाही. मी खोटारडी आहे आणि प्रसिद्धीसाठी अशी वागतेय, असं ते म्हणाले. माझ्याकडे कोणतेही फोटो किंवा व्हिडीओ नव्हते म्हणून ते माझ्यावर विश्वास ठेवत नव्हते. मी माझ्या लग्नालाही कोणाला आमंत्रित केलं नव्हतं. पण आता बिग बॉसमध्ये जेव्हा ही लोकं रितेशला पाहतील तेव्हा त्यांच्या शंका दूर होतील. माझ्या खातर त्याने बिग बॉसमध्ये येण्यास होकार दिला. तो खूप प्रेमळ आहे”, असे राखी म्हणाली होती.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा