अमित शहा म्हणाले म्हणून मुंबईत शिवसेनेचा महापौर, अन्यथा…; पाटलांचा राऊतांवर पलटवार

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषद घेत विरोधी पक्ष आणि केंद्रीय तपास यंत्रणांवर जोरदार निशाणा साधला. संजय राऊत यांनी केंद्रीय तपास यंत्रणांवर खळबळजनक आरोप केले आहेत. ईडीकडून शिवसेना नेत्यांना जाणीवपूर्वक त्रास देण्यात येत आहे. याबाबत संजय राऊत यांनी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्याकडे तक्रार केली आहे.

मुंबई पोलिसांकडे ईडीची चौकशी करण्याची मागणी संजय राऊत यांनी केली आहे. ही मुंबई आहे हे लक्षात ठेवा, ही मुंबई आहे आणि मुंबईचा दादा शिवसेना आहे, असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे. यावरून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आता निशाणा साधलाय. चंद्रकांत पाटील यांच्या महापौरपदावरून केलेल्या दाव्याने आता नव्या वादाला तोंड फुटले आहे. मुंबईत आमचीच चालती आहे, असे शिवसेना बोलत असते.

मुंबई आमचीच! सत्तेत असलेल्यांची भाषा अशी आहे का? मुंबईचा दादा शिवसेना आहे हा शिवसेनेचा गैरसमज आहे. शिवसेनेचे ८४ तर भाजपाचे ८२ नगरसेवक होते. केवळ अमित शहांनी म्हटले की, मुंबईचा महापौर शिवसेनेचा होऊ द्या म्हणून ते वाचले, नाही तर त्याचवेळी त्यांना कळाले असते की मुंबईचा दादा कोण आहे, असे म्हणत पाटलांनी संजय राऊतांच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला आहे.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा