InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

…..म्हणून मुख्यमंत्री सहाय्यता निधींकडून मदत करण्यास मुख्यंमंत्री असमर्थ

राज्यातील गरीब कुटुंबातील गरजू रुग्णांना आर्थिक मदत करणाऱ्या मुख्यमंत्री सहाय्यता निधीला पैशांची चणचण भासू लागली आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधी मिळावा यासाठी ४००० गरजू रूग्णांनी नोंदणी केली आहे. यासाठी १०० कोटींची आवश्यकता आहे. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्योगपतींना भेटणार असल्याचे समजते.

साताऱ्यातील सादिया कुरेशी यांना छातीच्या कॅन्सरवर उपचार करायचा आहे. त्यासाठी त्यांना तत्काळ ४ लाख रुपयांची आवश्यकता आहे. परंतु, मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी एनजीओ किंवा मुख्यमंत्री सहाय्यता निधींकडून आर्थिक मदत करण्यास असमर्थता दर्शवली आहे, असे सादिया यांचे पती रमजान कुरेशी यांनी सांगितले. मी दिसभरात ३०० ते ४०० रुपये कमावतो. शस्त्रक्रियेसाठी लागणारे ४ लाख रुपये मी कसे जमवू. मला मुख्यमंत्री सहाय्यता निधीकडून खूप अपेक्षा होती, असं कुरेशी यांनी सांगितले.

Loading...

रुग्णांची संख्या दिवसेदिवस खूप वाढत असून निधीसाठी दररोज ५०० अर्ज येतात, अशी माहिती मुख्यमंत्री सहाय्यता मदत केंद्र विभागातील मेडिकल असिस्ट्ंटचे प्रमुख ओमप्रकाश शेटे यांनी दिली.

Loading...
You might also like
Loading...

Comments are closed.