“महाराष्ट्राला दीड कोटी लस देणार असल्यानं केंद्राची पुनावालांना तंबी, म्हणून ते लंडनला गेले”

अहमदनगर : “सीरम कंपनीचे प्रमुख अदर पुनावाला यांनी जूनपासून दीड कोटी कोरोना लसी देण्याचं ठरवलं होतं. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांना केंद्र सरकारने तंबी दिली आणि ते लंडनला जाऊन बसले,” असा आरोप राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केलाय.

“कोरोना लसींचं सर्व नियंत्रण केंद्राने आपल्या हातात घेण्याची आवश्यकता आहे. मात्र, केंद्र सरकार 45 वर्षांवरील ते करणार आणि 18-44 वयोगटातील राज्यांनी करावं असं सांगत आहे हे बरोबर नाही. आम्ही ग्लोबल टेंडर काढलं. कोरोना लसीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 6 हजार कोटी रुपये एकरकमी देण्याची तयारी केली. असं असूनही कुठलीही लस उत्पादक कंपनी आमच्यासोबत बोलायला तयार नाही. या कंपन्या म्हणतात की आम्ही केंद्र सरकारसोबत बोलू,” असं हसन मुश्रीफ यांनी सांगितलं.

“महाराष्ट्रात तयार होणारी कोरोना लसही आपल्याला दिली जात नाहीये. एकीकडे हे राज्यांना लसीकरण करायला लावतात. दुसरीकडे लस उत्पादकांना धमक्या द्यायच्या ही पद्धत बरोबर नाही,” असं हसन मुश्रीफ म्हणालेत.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा