दिल्ली सरकारचा ‘ब्रँड ऍम्बेसेडर’ बनताच सोनूवर आयकर विभागाची धाड, हा पोरखेळ एकदिवस अंगावर उलटेल, राऊतांचा इशारा

मुंबई : कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या वेळी अभिनेता सोनू सूद भलत्याच झोतात आला. गोरगरीबांचा मसीहा, मुंबईतून परराज्यांत जाणारे मजूर वगैरे लोकांचा आधारस्तंभ म्हणून त्याचा बोलबाला सुरु झाला. बसेस, ट्रेन्स, विमाने बुक करून सोनू सूद मुंबईत अडकलेल्या लोकांना परराज्यांतील त्यांच्या घरी पाठवीत होता. अशी कामे सोनुने केली. यामुळे सर्वच स्तरातून सोनूचं कौतुक होत होत.

मात्र आता सोनू सूदवर आयकर विभागाने अचानक धाडी टाकल्या आहेत. याच विषयावरुन आजच्या सामना अग्रलेखातून भाजपवर जोरदार टीका करण्यात आलीय. सोनुने दिल्लीच्या केजरीवाल सरकारच्या शैक्षणिक कार्यक्रमाचे ‘ब्रॅण्ड ऍम्बेसेडर’ म्हणून सामाजिक कार्य करायचे ठरवताच त्यांच्यावर आयकर विभागाच्या धाडी पडल्या आहेत, असा दावा अग्रलेखातून संजय राऊत यांनी केलाय.

तसंच तुमचा हा पोरखेळ डाव एक दिवस तुमच्याच अंगावर उलटल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही देण्यात आला आहे.सोनुने दिल्लीच्या केजरीवाल सरकारच्या शैक्षणिक कार्यक्रमाचे ‘ब्रॅण्ड ऍम्बेसेडर’ म्हणून सामाजिक कार्य करायचे ठरवताच त्यांच्यावर आयकर विभागाच्या धाडी पडल्या आहेत, असं संजय राऊतांनी अग्रलेखात म्हटलंय.

आयकर विभागाने सोनूला पिळून काढल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. जे भाजपशी संबंधित नाहीत अशांचा तपास यंत्रणांच्या माध्यमातून बंदोबस्त करायचा हे एक धोरण ठरले आहे. त्यातून महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे मंत्री सुटले नाहीत तसे सोनू सूदसारखे कलाकार व सामाजिक कार्य करणारेही सुटले नाहीत, असं म्हणत राऊतांनी केंद्र सरकार आणि भाजपवर टीकास्त्र सोडलंय.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा