InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

‘मला माझी मशीद पुन्हा पाहिजे’; असदुद्दीन ओवेसी यांचे ट्विट

अयोध्या जमीन वादावर सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय घटनापीठाने ऐतिहासिक निकाल दिला आहे. यामध्ये अयोध्येतील वादग्रस्त जमीन रामजन्मभूमी न्यासाला देण्याचा निर्णय घेण्यात आला. तर मशिदीसाठी इतर ठिकाणी पाच एकर जागा देण्याचे आदेश देण्यात आले.

यावर प्रतिक्रिया देताना ओवेसींनी ती पाच एकर जागाही नको असा पवित्रा घेतला होता. आता त्यांना यावर एक नवी ट्विट केले आहे. मला माझी मशीद पुन्हा हवीये असे म्हणत एमआयएम प्रमुख, खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी पुन्हा एकदा आक्षेप घेतला आहे.

Loading...

ओवेसी यांनी एक ट्विट करून ‘मला माझी मशीद पुन्हा हवी आहे’, अशी मागणी केली आहे. ९ नोव्हेंबर रोजी सुप्रीम कोर्टाने अयोध्या खटल्यावर निकाल दिला. त्यावेळी ओवेसी यांनी आपला आक्षेप नोंदवला. मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाप्रमाणेच मीसुद्धा या निकालाशी सहमत नसल्याचे ते म्हणाले होते. सुप्रीम कोर्ट ‘सुप्रीम’ असले तरी कोर्टाकडूनही चूका होऊ शकतात. असे विधान ओवेसी यांनी केले होते.

- Advertisement -

Loading...
You might also like
Loading...

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.