Ashish Shelar | “उद्धव ठाकरेंनी सत्तेसाठी माती खाल्ली, बोटचेपी भूमिका घेतली” ; आशिष शेलार यांचा घणाघात

Ashish Shelar | मुंबई : भारत जोडो यात्रेवर (Bharat Jodo Yatra) असलेले राहुल गांधी (Rahul Gandhi) सातत्याने भाजप आणि आरएसएसवर निशाणा साधत आहेत. यासोबतच ते वीर सावरकर (Veer Savarkar) यांच्यावरही टीका करत आहेत. राहुल गांधी यांनी आज (गुरुवार) पुन्हा एकदा सावरकरांवर जोरदार टीका केली. दरम्यान भाजप आक्रमक झाली आही. भाजप आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी उद्धव ठाकरे व राहुल गांधी (Uddhav Thackeray and Rahul Gandhi) यांच्यावर घणाघात केला आहे.

आशिष शेलार (Ashish Shelar) म्हणाले, हिरवा झेंडा आणि हिरव्या झेंड्यांची मते एवढाचं अभ्यास राहुल गांधी (Rahul Gandhi)  यांनी केला आहे. त्यामुळे त्यांचे विधान म्हणजे बेअक्कलपणा आहे. त्याचा आम्ही निषेध करतो.”

यावेळी आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी उद्धव ठाकरेंवर देखील घणाघात केला. “हिंदुस्तानची ज्यांच्याकडून अपेक्षा होती ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अध्यक्ष उद्धवजींनी तरी बोटचेपीची भूमिका घेऊ नये, अशी अपेक्षा होती. पण उद्धवजींनी सत्तेसाठी माती खाल्ली आणि बोटचेपीची भूमिका घेतली. केवळ मी, माझा पक्ष आणि माझ्या पक्षाला सत्ता देणारे सहकारी यासाठी स्वत:च्या वडिलांच्या विचारांना तिलांजली देऊन उद्धवजी तुम्ही बोटचेपी भूमिका का घेतली?”, असा सवाल आशिष शेलार यांनी उपस्थित केला.

राहुल गांधी त्यांच्या विधानावर ठाम-

दरम्यान आज अकोल्यात बोलताना राहुल गांधी त्यांच्या विधानावर ठाम राहीले. यावेळी त्यांनी सावरकरांनी इंग्रजांना लिहिलेले पत्र वाचून दाखवले. राहुल गांधी म्हणाले की, सावरकरांनी घाबरून इंग्रजांची माफी मागितली, पण गांधीजी, नेहरू आणि पटेल यांनी तसे केले नाही. सावरकरांचे पत्र दाखवत राहुल गांधींनी शेवटची ओळही वाचून दाखवली. ‘मै आपका नौकर रहना चाहता हु’, असे सावरकरांनी लिहिले होते, असे राहुल गांधी म्हणाले.

यावेळी राहुल गांधी यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील टोला लगावला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सावरकरांचे पत्र बघायचे असेल तर त्यांनीही बघावे, असे राहुल गांधी म्हणाले. सावरकरांनी इंग्रजांना मदत केली होती. मी यावर अगदी स्पष्ट आहे. यावेळी राहुल गांधी म्हणाले की, या यात्रेमुळे देशाचे नुकसान होत आहे असे सरकारला वाटत असेल तर त्यांनी यात्रा थांबवण्याचा प्रयत्न करावा.

उद्धव ठाकरे यांची भुमिका – 

सावरकरांबद्दल आमच्या मनात प्रेम आहे. नितांत आदर आहे. मात्र ज्यांचा स्वातंत्र्य लढ्याशी संबंध नव्हता. अशा मातृसंस्थांच्या पिल्लांनी आम्हाला प्रश्न विचारावा हे दुर्देव आहे, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.

संघाला आता 100 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यांचं स्वातंत्र्य लढ्यातील योगदान काय आहे? हे आधी सांगा. बाष्कळपणा बंद करा. आपल्या मातृसंस्थेचा स्वातंत्र्य लढयात भाग नव्हता. त्यांनी आम्हाला प्रश्न विचारू नये. असं सांगतानाच निजामांच्या काळात हिंदूंवर अत्याचार होत होते. त्यावेळी तुमची मातृसंस्था कुठे होती? त्यांनी हिंदूंवरील किती अत्याचार थांबवले? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.