Ashish Shelar | काँग्रेस की हिंदुत्व? कबर की स्मारक?, आशिष शेलारांच्या प्रश्नाचे उत्तर उद्धव ठाकरे देतील का?

Ashish Shelar | टीम महाराष्ट्र देशा: हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून भाजपनं पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) घेरलं आहे. उद्धव ठाकरेंनी भाजपवर टीका केली होती. त्यामुळे भाजपनं आता उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. भाजपचे हिंदुत्व दुटप्पी असल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंना काही प्रश्न विचारले आहे.

आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी ट्विट करत उद्धव ठाकरे यांना काही प्रश्न विचारले आहे. औरंगाबाद की छत्रपती संभाजीनगर? काँग्रेस की हिंदुत्व? कबर की स्मारक? इत्यादी प्रश्न आशिष शेलारांनी उद्धव ठाकरेंना विचारले आहे.

Ashish Shelar asked a question to Uddhav Thackeray

महाराष्ट्र आता रस्त्यावर होर्डिंग लाऊन उबाठाला थेट विचारतोय…
◆ औरंगाबाद की छत्रपती संभाजी महाराज नगर?
◆ उस्मानाबाद की धाराशिव?
◆ अहमदनगर की पुण्यश्लोक
अहिल्यानगर?
◆ काँग्रेस की हिंदुत्व?
◆ कबर की स्मारक?
आणि
◆ औरंगजेब की सावरकर?
म्हणून
शब्दांची कोटी न करता..
मर्द, खंजीर… असले शब्द न वापरता…
उबाठा प्रमुखांनी महाराष्ट्राला स्पष्ट शब्दात सांगावे…
यापैकी नेमके काय?
कि दोन्ही?
नाही तर लहानपणीचा खेळ..
एवढं एवढं पाणी आणि गोलगोल “गाणी”

दरम्यान, आशिष शेलार (Ashish Shelar) यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहे. त्यांच्या या प्रश्नांवरून राज्याच्या राजकारणात नवा वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्याचबरोबर आशिष शेलार यांच्या या प्रश्नावर उद्धव ठाकरे काय उत्तर देतील? याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे.

महत्वाच्या बातम्या

Original NEWS SOURCE – https://bit.ly/44jD1Vn