Ashish Shelar | “तोंड बंद करा, नाहीतर मी नावासहित सांगेन की…”; आशिष शेलारांचा इशारा काय?
Ashish Shelar | मुंबईः महाविकास आघाडी सरकारच्या काळात मला तुरुंगात टाकण्याचा डाव होता, असा गंभीर आरोप राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केला होता. फडणवीसांच्या आरोपानंतर अनेक राजकीय नेते मंडळींमध्ये आरोप-प्रत्यारोप करण्यात आले. अशातच वकील गुणरत्न सदावर्ते यासंदर्भात शरद पवारांवर गंभीर आरोप केले.
“देवेंद्र फडणवीसांच्या अटकेचा कट हा शरद पवार यांनीच रचना होता” असा आरोप गुणरत्न सदावर्ते यांनी केला आहे. या आरोपांना दुजोरा देत मुंबईचे भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनीही यावर आज भाष्य केलं. भाजपावर आरोप करणाऱ्यांनी तोंड बंद करावीत. अन्यथा देवेंद्र फडणवीस यांना अडकवण्याचा प्रयत्न नेमकं कोण करत होतं, ते मी नावासहित उघड करेन, असा इशारा आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी दिला आहे.
ते म्हणाले, “महाविकास आघाडी सरकारच्या काळात देवेंद्र फडणवीस यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न झाला. त्याचा साक्षीदार मी आहे. तत्कालीन पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी त्यांच्या खासगी जागेत 250 पानांचा रिपोर्ट ठेवला होता. त्यानंतर तो सार्वजनिक ठिकाणी आणला. तो रिपोर्ट मी स्वतः वाचला आहे.”
दरम्यान, भाजप सुडाचं राजकारण करतंय, असा आरोप सुप्रिया सुळे यांनी केलाय. त्यावर आशिष शेलार म्हणाले, “सुप्रियाताईंनी पुन्हा एकदा गजनी सिनेमा पाहावा अशी माझी इच्छा आहे. कारण त्या सिनेमात शॉर्ट मेमरीचा आजार असल्याचं दाखवलंय. ताईंना असा आजार होऊ नये अशी माझी इच्छा आहे. कारण त्यांची वक्तव्य त्याच पद्धतीची दिसतायत. मी पूर्ण यादी वाचून दाखवेन ताईंना. सूडाच्या राजकारणाची भूमिका टोकापर्यंत नेणारं सरकार म्हणजे उद्धव ठाकरेंचं शरद पवार आणि काँग्रेसच्या समर्थनाचं सरकार होतं.”
महत्वाच्या बातम्या :
- Ashish Shelar |“सुप्रिया सुळेंनी गजनी चित्रपट पुन्हा पाहावा”; आशिष शेलार असं का म्हणाले?
- Uddhav Thackeray | “लांडगे विकले गेले, त्यांचा भाव सर्वांना माहितीच आहे”; मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात ठाकरेंचा हल्लाबोल
- Jayant Patil | “पहाटेचा ‘तो’ शपथविधी राजकीय खेळी असू शकते, राष्ट्रपती राजवट…”-जयंत पाटील
- BJP | “उद्धव ठाकरे वंचितमध्ये प्रवेश करणार आहेत का?”; भाजपच्या ‘या’ नेत्याचा सवाल
- Gopichand Padlkar | “मिरजेतील जागा आमचीच, अतिक्रमण केलं तर…”; तहसीलदारांच्या निकालानंतर पडळकरांचा इशारा
Comments are closed.