Ashish Shelar | भ्रष्टाचाराची यांची अशी किर्ती थोर, चोर मचाए शोर; आशिष शेलार यांनी ठाकरे गटाचे कान टोचले

Ashish Shelar | टीम महाराष्ट्र देशा: आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या नेतृत्वाखाली ठाकरे गट आज मोर्चा काढणार आहे. ऊन असो वा पाऊस मोर्चा निघणारच असं म्हणत उद्धव ठाकरे गट आज मुंबई महानगरपालिकेकडे जाणार आहे. ठाकरे गटाच्या या मोर्चाला शिंदे-फडणवीस सरकारकडून प्रत्युत्तर दिलं जाणार आहे. याच पार्श्वभूमीवर आशिष शेलार यांनी एक ट्विट केलं आहे.

The Uddhav Thackeray group is going to raise slogans against itself today – Ashish Shelar

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गट आज स्वतःच्याच विरोधात नारे देणार असल्याचं आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी ट्विट करत म्हटलं आहे. त्याचबरोबर या ट्विटच्या माध्यमातून आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे गटावर खोचक टीका केली आहे. ट्विट करत आशिष शेलार म्हणाले, “मुंबईकर हो, उबाठा गट आज स्वतःच्या विरोधात देईल ते नारे ऐका…

■खा लो महापालिका
चलो महापालिका..!

■अरे, आवाज कुणाचा?
पालिका खाणाऱ्यांचा!

■देखो देखो कौन आया?
नाले का कीचङ खानेवाला शेर आया!

■ मुंबईकरांचे 3 लाख कोटींचे खोके गेले कुठे?
खाऊन पिऊन सगळं ok !

भ्रष्टाचाराची यांची अशी किर्ती थोर
चोर मचाए शोर!!
चोर तर चोर वरुन शिरजोर?”

‘चोर मचाये शोर’ म्हणतं भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि आरपीआय ठाकरे गटाच्या या मोर्चाला उत्तर देणार आहे. सत्ताधाऱ्यांचा हा मोर्चा नरिमन पॉईंट येथून आज दुपारी 04 वाजता सुरू होणार आहे. या मोर्चाच्या माध्यमातून शिंदे गट आणि ठाकरे गट पुन्हा एकदा आमने-सामने (Ashish Shelar) येणार आहे.

दरम्यान, आदित्य ठाकरे यांचा धडक मोर्चा मरीन लाइन्सपासून ते मुंबई महानगरपालिका मुख्यालयापर्यंत निघणार आहे. मुंबईमध्ये विकास कामात झालेल्या भ्रष्टाचाराच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाकडून हा मोर्चा (Ashish Shelar) काढण्यात येणार आहे.

महत्वाच्या बातम्या

Original NEWS SOURCE – https://bit.ly/46yqyPA