Ashish Shelar | “मातोश्रीच्या बाहेरच्या डबक्यात कागदी होड्या सोडायच्या वयात हे..”; आशिष शेलारांचा आदित्य ठाकरेंवर घणाघात

Ashish Shelar | मुंबई: मुंबईमध्ये पहिल्या पावसानंतर जागोजागी पाणी साचलं होतं. पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर टीका केली होती. त्यांच्या या टीकेला भाजप नेते आशिष शेलार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. मातोश्रीच्या बाहेरच्या डबक्यात कागदी होड्या सोडायच्या वयात आदित्य ठाकरे मुंबईच्या पावसावर बोलत आहे, अशी खोचक टीका आशिष शेलार यांनी आदित्य ठाकरेंवर केली आहे.

आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी ट्विट करत आदित्य ठाकरेंवर शाब्दिक हल्लाबोल केला आहे. ट्विट करत आशिष शेलार म्हणाले, “तमाशामधील आबुराव आणि बाबुराव एकापेक्षा एक फेकम फाक करुन मनोरंजन करतात…उबाठाचे विश्वविख्यात प्रवक्ते आबुरावपेक्षा कमी नाहीत. काल मातोश्रीच्या युवराजांनी बाबुरावची जागा घेतली… म्हणे, त्यांच्या कार्यकाळात मुंबईत एका तासाला 400 mm पाऊस झाला, त्याचे यशस्वी व्यवस्थापन त्यांनी केले. मुंबईत एका तासात 400 mm? कधी एवढा पाऊस पडला? युवराज मुंबईची आकडेवारी सांगतात, की चेरापुंजीची? मुंबईत 26 जुलै 2005 ला पण एवढा पाऊस एका तासात झाला नव्हता. यांची फेकंम् फाक तर त्या आबुराव, बाबुरावपेक्षा ही भयंकर!”

“At the age of leaving paper bags in the bin outside Matoshree…”

“मुंबईकर हो, दोष युवराजांचा नाही, मातोश्रीच्या बाहेरच्या डबक्यात कागदी होड्या सोडायच्या वयात हे मुंबईच्या पावसावर बोलणार तर असेच होणार ना? म्हणून युवराजांसाठी आमची प्रार्थना… इन्हे कोई लौटा दो बचपन का सावन
वो काग़ज़ कि कश्ती, वो बारिश का पानी!”, असही आशिष शेलार यांनी या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, पहिल्या पावसानंतर मुंबईत साचलेल्या पाण्यावर प्रतिक्रिया देताना आदित्य ठाकरे म्हणाले, “मुंबईत पाऊस पडल्यानंतर मी, महापौर किंवा उद्धव ठाकरे स्वतः जाऊन त्या जागेची पाहणी करायचो आणि लोकांशी बोलायचो. लोकांना काही समस्या निर्माण झाल्या असतील किंवा काही असुविधा होत असेल तर आम्ही त्या सोडवायचा प्रयत्न करायचो.

महत्वाच्या बातम्या

Original NEWS SOURCE – https://bit.ly/3r3nfQ5