Ashish Shelar | रस्त्यांच्या कामावरुन विधानसभेत आदित्य ठाकरे-आशिष शेलार यांच्यात खडाजंगी

Ashish Shelar | मुंबई : मुंबई महापालिकेच्या हद्दीतील 400 किलोमीटर रस्त्यांच्या कामात 6 हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी यापूर्वी सतत केला आहे. आजही आदित्य ठाकरेंनी हा मुद्दा विधानसभेत उपस्थित केला. यावरून भाजप आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) आणि आदित्य ठाकरे यांच्यात जोरदार खडाजंगी झाल्याचे पहायला मिळाले आहे.

काय म्हणाले आदित्य ठाकरे?

“मुंबईतील 400 किलोमीटर रस्त्यांच्या कामासाठी 6 हजार 80 कोटी रूपयांचा खर्च होणार आहे. मात्र, पावसाळ्याच्या पूर्वी ही कामं सुरू होणार का? किंवा पूर्ण होतील का? कामं सुरू झाली नाहीतर आगाऊची रक्कम देऊ नये. कंत्राटदारांना 48 टक्के अधिकची रक्कम आणि 18 टक्के जीएसटी हा विषय कसा घडला? याकडे अर्थमंत्र्यांनी लक्ष द्यावे”, असे आदित्य ठाकरे विधानसभेत बोलताना म्हणाले.

“महापालिकेने सांगितलं होतं, जिथे-जिथे रस्त्यांची कामं सुरू होतील, तेथील सीसीटीव्ही फुटेज आणि माहिती मिळेल. मात्र, अद्यापही याला सुरूवात झाली नाही. ते कधीपासून सुरू होणार?,” असा सवाल आदित्य ठाकरेंनी उपस्थित केला. यावर आशिष शेलार यांनी सडेतोड उत्तर दिले आहे.

आशिष शेलारांंचं प्रत्युत्तर

“48 टक्क्यांचा प्रश्न उपस्थित केला जात आहे. कारण, राष्ट्रीय स्तरावरील मोठ्या कंपन्या मुंबई शहरात आल्या. एखाद्या विशिष्ट कंपनीला काम मिळालं नाही. त्यामुळे ही पोटदुखी होत आहे. हे राजकारण आहे. भ्रष्टाचारी कंपनीला काम मिळाले नसल्यानेच ही पोटदुखी होत आहे. पण आम्ही चर्चेला तयार आहोत. रस्त्याच्या भ्रष्टाचाराबद्दल 25 वर्षाची चौकशी मुख्यमंत्र्यांनी करावी”, असे आशिष शेलार म्हणाले आहेत.

Ashish Shelar criticize Aaditya Thackeray

“गेल्या 25 वर्षात 12 हजार कोटी रूपये रस्त्यांवर खर्च झाले आहेत. त्याची चौकशी होऊन जाऊद्या,” अशी मागणी आशिष शेलार यांनी केली”, अशी मागणी शेलार यांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या- 

You might also like

Comments are closed.