Ashish Shelar | “राहुल गांधींना झप्पी मारणारे आदित्य ठाकरे गप्प का?”; आशिष शेलारांचा खोचक सवाल
Ashish Shelar | मुंबई : भारत जोडो यात्रेमध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी विनायक दामोदर सावरकर (Vinayak Damodar Savarkar) यांच्यावर केलेल्या टीकेमुळे राजकीय वातावरण तापलेलं आहे. तुरुंगात असताना भीतीपोटी माफीनाम्यावर स्वाक्षरी करून सावरकरांनी ब्रिटीशांना मदत केली आणि महात्मा गांधी आणि इतर समकालीन भारतीय नेत्यांचा विश्वासघात केला, असा दावा राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केला. राहुल गांधी यांनी केलेल्या या वक्तव्यावर आदित्य ठाकरे का गप्प आहेत? असा सवाल भाजपा मुंबई अध्यक्ष आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी उपस्थित केला आहे.
ते म्हणाले, “राहुल गांधी जाणूनबुजून सावरकरांचा अपमान करत आहेत. भारताच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी काळ्या पाण्याची शिक्षा भोगली, त्यांचा अपमान म्हणजे महाराष्ट्राचा अपमान काँग्रेस करत आहे. शिवसेना सत्तेसाठी माती खात असून, केवळ बोटचेपी भूमिका घेत इशारे देण्याचे काम करत आहे.”
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी यांनी मणिशंकर अय्यर यांना जोडे मारले होते. ‘भारत जोडो यात्रेत’ राहुल गांधींना झप्पी मारणारे आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) गप्प का? राहुल गांधींच्या वक्तव्याचा निषेध का करत नाही? असा प्रश्न आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी आदित्य ठाकरेंना केला आहे.
पुढे ते म्हणाले, “मराठी माणूस, देशभक्त नागरिक उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंना माफ करणार नाही. तुमचं राजकारण आणि महाविकास आघाडी तुम्हाला लखलाभ राहो. शिवसेनेने महाराष्ट्र धर्म निभावत, निर्णय घ्यावा,” असेही शेलार यांनी म्हटलं. भाजपाचे नेते राहुल गांधींना उघड पाडल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही शेलारांनी यावेळी दिलाय.
महत्वाच्या बातम्या :
- Sunil Kedar | मविआच्या बैठकीत संजय राऊतांच्या वक्तव्याची चर्चा होईल- सुनिल केदार
- Tushar Gandhi | “राहुल गांधी सत्यच बोलले, एकेकाळी सावरकर…”; महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधींनी सावरकरांवरील टीकेचं केलं समर्थन
- Rahul Gandhi | सावरकरांचे नातू रणजीत सावरकर आक्रमक! राहुल गांधींविरोधात घेणार पत्रकार परिषद
- Maarrich Trailer | सस्पेन्स आणि थ्रिलरने भरलेला तुषार कपूरचा ‘मारिच’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज
- Congress | महाविकास आघाडीत काँग्रेस-शिवसेनेत सावरकरांवरुन मतभेद! काँग्रेसने दिलं स्पष्टीकरण
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.