Ashish Shelar | शरद पवारांचं स्टेटमेंट म्हणजे गुगली नाही तर गाजराची पुंगी – आशिष शेलार

Ashish Shelar | मुंबई: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पहाटेच्या शपथविधीवर शरद पवार (Sharad Pawar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मी गुगली टाकून देवेंद्र फडणवीस यांची विकेट घेतली, असं शरद पवार म्हणाले होते. शरद पवार यांच्या या वक्तव्याला आशिष शेलार यांनी उत्तर दिलं आहे. शरद पवारांचं स्टेटमेंट म्हणजे गुगली वगैरे नाही, तर ती गाजराची पुंगी आहे, असं वक्तव्य आशिष शेलार यांनी केलं आहे.

We don’t consider Sharad Pawar’s statement as googly – Ashish Shelar

आशिष शेलार (Ashish Shelar) म्हणाले, “शरद पवार यांच्या स्टेटमेंटला आम्ही गुगली वगैरे म्हणत नाही. ती गाजराची पुंगी आहे. शरद पवारांनी वाजली तिथे पुंगी वाजवली. जिथे नाही वाजली तिथे त्यांनी ती खाऊन टाकली. त्यामुळे आम्ही याला गुगली वगैरे म्हणत नाही. शरद पवार यांनी त्या काळात सत्तेसाठी वेगवेगळ्या पक्षांची चर्चा केली आहे.”

पुढे बोलताना ते (Ashish Shelar) म्हणाले, “शरद पवारांच्या या गाजराच्या पुंगीमुळे उद्धव ठाकरेंचं (Uddhav Thackeray) नाव, सत्ता, पक्ष, हिंदुत्व सर्व काही गेलं आहे. या गाजराच्या पुंगीमुळे उद्धव ठाकरे भूल दिल्यासारखे झाले आहेत. त्यामुळे उद्धवजींचा पक्ष संपला आहे.”

“राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर भरोसा ठेवू नका, असं एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि त्यांचे सहकारी उद्धव ठाकरे यांना वारंवार सांगत होते. मात्र, उद्धव ठाकरे यांनी त्यांचं ऐकलं नाही. शरद पवार हे उद्धव ठाकरेंसोबत प्रामाणिक नव्हते आणि आजही नाही”, असेही ते (Ashish Shelar) यावेळी म्हणाले आहे.

महत्वाच्या बातम्या

Original NEWS SOURCE – https://bit.ly/3PCOGKB