Ashish Shelar | “संजय राऊत कोठ्यावर जात असतील म्हणून..”; आशिष शेलारांचा पलटवार

Ashish Shelar | मुंबई : शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलेल्या तीन दिवसांपूर्वी एका मुलीचा फोटो ट्विटवरून शेअर केला होता. त्यावरु राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या या मुलीचा फोटो ट्वीट केल्याने संजय राऊतांवर गुन्हा दाखल देखील झाला आहे.

गुन्हा दाखल केल्यानंतर संजय राऊतांनी ‘राज्याची कायदा-सुव्यवस्था काही लोकांच्या कोठ्यावर नाचतेय’, अशा शब्दांत सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केला. राऊतांच्या या टीकेला आता भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

“संजय राऊत कोठ्यावर जात असतील म्हणून..

“संजय राऊत कोठ्यावर जात असतील म्हणून, तसले प्रकार त्यांना माहिती असतील. गेल्या आठवड्याभरात किती ठिकाणी ते गेले, त्याचं नाव सांगावं. नाहीतर सीबीआयला तक्रार करणार,” अशी टीका आशिष शेलार यांनी केली आहे.

संजय राऊत काय म्हणाले?

“मी काय चुकलो? या मुलीवर कोयत्याचे वार झाले आहेत, या मुलीची आई माझ्याशी बोलली, तिच्या आईनं आक्रोश करत सरकारकडे ‘जर माझ्या मुलीला न्याय मिळाला नाही, तर मला इच्छामरणाची परवानगी द्या’ अशी मागणी केली आहे. पारधी समाजातली ही मुलगी आहे. बार्शीतल्या काही गुंड टोळ्यांनी तिच्यावर निर्घृणपणे हल्ला केला. अजूनही काही मुख्य आरोपी बाहेर आहेत. जर मी दिल्लीत असताना मुख्यमंत्र्यांपर्यंत तो विषय पोहोचवायचा असेल तर मी ज्या माध्यमातून पोहोचवायला हवा, त्या माध्यमातून पोहोचवला आहे”, असे संजय राऊत म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या-