Ashish Shelar | सुषमा अंधारेंवर उद्धव ठाकरे काय कारवाई करणार? ; आशिष शेलार यांचा सवाल
Ashish Shelar | मुंबई : राज्यात अनेक नेत्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे राजकीय वातावरण तापलेलं आहे. यामध्ये शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांच्या वक्तव्याची भर पडली आहे. अंधारे यांनी संतांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. “रेड्याला शिकविण्याचे सामर्थ इथल्या संतांमध्ये आहे म्हणुन चमत्कार …आरे तुम्ही रेंड्यांना शिकवलं रे..! माणसांना कुठं शिकवलं”, असं विधान सुषमा अंधारे यांनी केलं होतं. यावर वारकरी संप्रदाय आक्रमक झाला असून भाजप नेते आशिष शेलार यांनी देखील उद्धव ठाकरेंवर घणाघात केला आहे.
आशिष शेलार म्हणाले, “ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस!, अशी अखंड परंपरा असलेला महान वारकरी संप्रदाय हा जगाचा अभ्यासाचा विषय ठरला आहे. इथे महाराष्ट्रात कोणीतरी कालपरवाच चर्चेत आलेल्या सुषमाताई अंधारे या वारकरी संप्रदायाचा अपमान करतात? वारकऱ्यांच्या श्रध्देची खिल्ली उडवतात?”
“उद्धव ठाकरे हा महाराष्ट्र द्रोह नाही का?. आपली त्यांना मुकसंमती आहे का?. हिंदू देवदेवता आणि संत परंपरेच्या अपमानासाठी सुषमाताईंच्या नेतृत्वात नवी सेना उघडली का? तुम्ही विठ्ठलाच्या पुजेला गेलात, आणि पदस्पर्शही केला नाहीत त्याचाच हा पुढचा टप्पा आहे का?. वारकरी संप्रदायाच्या भावना दुखावणाऱ्या सुषमा अंधारे यांच्यावर उद्धव ठाकरे जी काय कारवाई करणार?, असा सवाल आशिष शेलार यांनी उपस्थित केला आहे.
दरम्यान, सुषमा अंधारे यांनी वारकरी संप्रदायाची माफी मागितली आहे. वारकरी संप्रदायाला जर वाटत असेल, ताई तुमचं चुकत आहे. तर दोन्ही हात जोडून माफी मागताना गैर वाटणार नाही, असं म्हणत त्यांनी वारकरी संप्रदायाची माफी मागितली आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Winter Health Care | हिवाळ्यामध्ये निरोगी राहण्यासाठी दुधासोबत करा ‘या’ गोष्टींचे सेवन
- Rohit Pawar | “संतांच्या बाबतीत चुकीचं विधान केल्यास…”; रोहित पवारांचा सुषमा अंधारेना सल्ला
- Mohammad Rizwan | “टीम इंडियाला हरवल्यानंतर आम्हाला सगळं…”; मोहम्मद रिझवानने केले वक्तव्य
- Sachin Sawant | “भाजपाने चीनच्या शी जिनपिंग यांचा आदर्श घेतला का?” ; सचिन सावंत असं का म्हणाले?
- Ajit Pawar | “सत्ताधारी लोकांच्या सुरू असलेल्या चौकशींना क्लीनचीट आणि…” ; अजित पवारांना शंका
Comments are closed.