सुप्रिया सुळेंच्या गाझीपुर दौऱ्यावर आशिष शेलारांची टीका म्हणाले…

तीन कृषी कायद्यांविरोधात शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. केंद्र सरकारच्या ३ कृषी कायद्याविरोधात शेतकरी २ महिन्यांपेक्षा अधिक काळ लोटला तरी दिल्लीत आंदोलन करत आहेत. प्रजासत्ताक दिनाला या आंदोलनाला हिंसक वळण आलेले देखील सगळ्यांनी पाहिले. पण त्यानंतरही शेतकरी बांधव शांतपणे पुन्हा एकदा आंदोलन करत आहेत.

दिल्ली बॉर्डरवर शेतकरी आंदोलन सुरू असून बॉर्डर छावणीत रुपांतरीत करण्यात आले आहे. कृषी कायद्याविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांची सरकार चांगलीच कोंडी करत आहे. सीमा भागातील रस्त्यावर कॉक्रिटचे पक्के अडथळे उभारुण रस्ते बंद करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.

याच पार्श्वभूमीवर अशातच राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आज गाझीपूर बॉर्डरवर आंदोलकांची भेट घेण्यासाठी जाणार आहेत. केंद्र सरकार ज्याप्रकारे शेतकऱ्यांवर अन्याय करत आहे अशा परिस्थितीत बळीराजाला सध्या आधाराची गरज आहे. गाझीपूरला जाऊन मी शेतकऱ्यांशी आणि शेतकरी नेत्यांशी चर्चा करणार आहे, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, शिवसेना नेते संजय राऊतांच्या नेतृत्वाखाली सेनेच्या शिष्टमंडळाने गाझीपूरला जाऊन शेतकऱ्यांची भेट घेतल्यानंतर आता सुप्रिया सुळेही आज गाझीपूर सीमेवर जाऊन शेतकऱ्यांना भेटून त्यांना आपला पाठिंबा देणार आहे.

दरम्यान सुप्रिया सुळे यांच्या गाझीपूर दौऱ्यावर आशिष शेलार यांनी टीका केली आहे. सुप्रिया सुळे यांना विनंती आहे की, आपल्या बारामतीमध्ये, बारामती ॲग्रोच्या माध्यमातून कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग पद्धत आपण का अवलंबताय?, या प्रश्नाचं उत्तर द्या आणि मग गाझीपूर सीमेवर आंदोलक शेतकऱ्याांना भेटायला जा, अशा शब्दात शेलार यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर टीका केली आहे.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा