InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट
Loading...

‘या निर्णयामुळे भविष्यात मोठा अनर्थ ओढावेल’, आशिष शेलार यांची मुख्यमंत्र्यांना हात जोडून विनंती

आरे मेट्रो कारशेडला स्थगिती देण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केला. आरेतील रातोरात झालेली वृक्षतोड आणि याबद्दलच्या पर्यावरण प्रेमींच्या भावना लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला. यावर भाजप नेत्यांच्या तीव्र प्रतिक्रिया येत आहेत. या निर्णयामुळे भविष्यात मोठा अनर्थ ओढावेल, अशी भीती माजी मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केली. भाजप नेते आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना हात जोडून विनंती केली आहे.

सरकारच्या निर्णयामुळे मेट्रो प्रकल्पाचा खर्च तर वाढेलच शिवाय या प्रकल्पांना प्रचंड विलंबही होणार असल्याची भीती आशिष शेलार यांनी व्यक्त केली. या निर्णयातून एखाद्याचा अहंकार साधला जाईल. परंतु जनहित मात्र साधले जाणार नाही. केवळ अहंकारापोटी असं करू नका, अशी आमची त्यांना हात जोडून विनंती असल्याचे शेलार म्हणाले.

Loading...

- Advertisement -

 

Loading...
You might also like
Loading...

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.