Ashok Chavan | अशोक चव्हाणांवर घराणेशाहीचा आरोप; मुलगी श्रीजयाचे लावले भावी आमदार म्हणून पोस्टर

Ashok Chavan | नांदेड: भारतीय चित्रपट सृष्टी असो किंवा राजकारण असो घराणेशाहीवर नेहमीच टीका केली जाते. घराणेशाहीवरून राजकारणामध्ये सत्ताधारी आणि विरोधक यांच्याकडून आरोप प्रत्यारोप केले जातात. मात्र, मुलांमध्ये जर नेतृत्वाचे गुण असतील तर त्यांना स्वीकारायला काय हरकत आहे? असं समर्थन देखील अनेक राजकारण्यांकडून केलं जातं. याच पार्श्वभूमीवर राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यावर घराणेशाहीचा आरोप करण्यात आला आहे. अशोक चव्हाण यांची कन्या श्रीजया (Shri Jaya) राजकारणात सक्रिय झाल्या आहे.

राहुल गांधींच्या नेतृत्वामध्ये सुरू झालेली भारत जोडो यात्रा नांदेडमध्ये जेव्हा दाखल झाली होती, तेव्हा श्रीजया त्यांच्यासोबत चालताना दिसल्या होत्या. अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी यात्रेचे नियोजन करण्यासाठी मदत केली होती, असं श्रीजया यांनी सांगितलं होतं. तेव्हापासूनच अशोक चव्हाण यांच्यावर घराणेशाहीचा आरोप केला जात आहे.

Poster of Ashok Chavan’s daughter Srijaya as future MLA

श्रीजया यांचा वाढदिवस 25 मे रोजी असतो. त्यानिमित्ताने भावी आमदार म्हणून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. या बॅनरची चर्चा सर्वत्र सुरू झाली आहे. त्याचबरोबर या बॅनरनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

दरम्यान, श्रीजया राजकारणामध्ये सक्रिय झाल्या तर ती अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांची ती तिसरी पिढी ठरणार आहे. अशोकराव चव्हाण यांनी भोकर मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. त्याचबरोबर पत्नी अमिता चव्हाण यांनी यापूर्वी निवडणूक लढवली. आता मुलगी श्रीजया देखील याच मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

महत्वाच्या बातम्या

Original NEWS SOURCE – https://bit.ly/41WBOlf