Ashok Chavan | “थोरातांची मनधरणी करण्यासाठी मी पुढाकार घेणार”; थोरातांच्या राजीनाम्यानंतर अशोक चव्हाणांचं वक्तव्य

Ashok Chavan | मुंबई : राज्यात नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या निमित्ताने काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला. काँग्रेसमदध्ये बंडखोरी करणारे नेते सत्यजीत तांबे यांना डावलल्यामुळे तांबे कुटुंबाने प्रदेश काँग्रेसवर गंभीर आरोप केले आहेत. त्यानंतर अपक्ष आमदार सत्यजीत तांबे यांचे मामा आणि काँग्रेसमधील वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेस पक्षाच्या विधीमंडळ पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला आहे.

Balasaheb Thorat Resign

बाळासाहेब थोरात यांचा आज वाढदिवस आहे आणि वाढदिवसाच्या दिवशीच बाळासाहेब थोरात यांच्या या निर्णयामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. काँग्रेसधील याच अंतर्गत राजकारणावर आता काँग्रेसचे नेते अशोच चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

“त्यांची मनधरणी करण्यासाठी मी पुढाकार घेणार”- Ashok Chavan

“बाळासाहेब थोरात यांच्या राजीनाम्याबद्दल आत्ताच कळालं असून त्यांचा राजीनामा ही दुर्दैवी बाब आहे. आज थोरात यांचा वाढदिवस असून सकाळीच मी त्यांना शुभेच्छा दिल्या. थोरात यांची मनधरणी करण्यासाठी मी पुढाकार घेणार आहे. काँग्रेस पक्ष वाढीसाठी सर्व काही करणार आहे. थोरात पक्ष सोडून जाणार नाहीत” असं म्हणत अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला आहे.

नाना पटोलेंचं वक्तव्य (Nana Patole’s Statement)

“नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या निमित्ताने बरंच राजकारण शिकायला मिळालं. माझ्याकडे या सगळ्या गोष्टींकडे लक्ष द्यायला वेळ नाही. मला काँग्रेसच्या विचारसरणीला पुढे नेऊन निवडणुकांमध्ये विजयी करायचं आहे. ते काम मी करत आहे. कोण काय राजकारण करत आहे त्यात मला पडायचं नाही. मी एक सामान्य शेतकरी माणूस आहे. मला या सगळ्या राजकारणात पडायचं नाहीये. मी सरळ मार्गाने या राजकारणात आलो आहे”, असं नाना पटोले म्हणाले आहेत.

असलं घाणेरडं राजकारण कधीच करणार नाही” Nana Patole comment on Balasaheb Thorat)

“मला पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीदरम्यान राजकारणातल्या खूप साऱ्या गोष्टी शिकायला मिळाल्या. मी आजपर्यंत ज्या गोष्टी केल्या नव्हत्या, त्या मला शिकायला मिळाल्या. पण मी या प्रकारचं घाणेरडं राजकारण कधीच नाही करणार”, अशी सूचक वक्तव्य नाना पटोले यांनी यावेळी केलं आहे.

चंद्रशेखर बावनकुळे यांचे वक्तव्य (Chandrashekhar Bawankule’s Statement)

बाळासाहेब थोरातांच्या राजीनाम्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. तसेच या राजीनाम्यानंतर बाळासाहेब थोरात आगामी काळात कोणता निर्णय घेणार? याकडेही सर्वांचेच लक्ष लागले आहे. यावरच भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सूचक प्रतिक्रिया दिली आहे. कुणालाही भाजपत यायचे असेल तर ते येऊ शकतात. आम्ही सर्वांचे स्वागतच करत आहोत, असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या-