अशोक चव्हाण आणि महाविकास आघाडीचं ‘नाचता येईना अंगण वाकडं : प्रविण दरेकर

मुंबई : गेल्या अनेक दिवसापासून मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यात चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने महत्त्वाचा निर्णय घेऊन 102 व्या घटना दुरूस्तीचा प्रस्ताव मान्य केला आहे. त्यामुळे एखाद्या जातीला मागास ठरवून तिला आरक्षण देण्याचा राज्यांचा अधिकार केंद्र सरकारने मान्य केला आहे. याबाबत संसदेत विधेयक मंजूर केलं जाईल.

यानंतर आता मराठा समाजाला आरक्षण देण्याचा मार्ग मोकळा झाला अशी चर्चा सुरू झाली आहे. मात्र मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी हा दावा फेटाळून लावला आहे. तसेच असं मानणं हा गैरसमज असल्याचं नमूद केलं आहे. काल घेतलेल्या पत्रकार परिषदेत अशोक चव्हाण यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे.

यानंतर अशोक चव्हाणांच्या या टीकेला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी प्रत्युत्तर देत राज्य सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. अशोक चव्हाण आणि महाविकास आघाडी सरकारची अवस्था नाचता येईना अंगण वाकडं, अशी झाली असल्याचं दरेकर यांनी म्हटलं आहे. केंद्र सरकारची भूमिका मराठा आरक्षणाच्या बाजूनं आहे. त्यामुळे 102व्या घटनादुरुस्तीत बदल करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतलाय. मात्र, राज्य सरकारची हतबलता असल्यामुळे ते आरक्षण देऊ शकत नसल्याचं दरेकर यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या

 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा