InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

आश्वसनाची खैरात करणाऱ्या सरकारला आता भिक घालु नका – अशोक चव्हाण

पैठण / किरण काळे- आश्वसनाची खैरात करणाऱ्या सरकारला आता भिक घालु नका तर या निकामी सरकारला २०१९ च्या निवडणुकीत धडा शिकवा असे आवाहन खा. अशोक चव्हाण यांनी केले ते पैठण येथे शिवाजी चौकात दुष्काळी मोर्चात बोलत होते.

खा. अशोकराव चव्हाण म्हणाले हे सरकार युवकांना रोजगार, शेतकऱ्यांना मदत, विज, पाणी, निट रस्ते देऊ शकले नाहीत, गँस, पेट्रोल, डिझेल, यासह जीवनावश्यक वस्तूंच्या किमती गगनाला जाऊन भिडल्या आहेत. एवढच नाही तर दुष्काळ जाहीर केला मात्र त्याचा मुकाबला आणि निपटारा कसा करावा याचे नियोजन केले नाही. दुष्काळी परिस्थिती असताना अर्थीक व साधनांची उपलब्धता करून देण्याऐवजी पैठणचे आमदार आणि राज्याचे मुख्यमंत्री कबड्डी सामने घेत आहेत ही शोकांतिका आहे तर महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी पाच वर्षे नुसता अभ्यास केला मात्र हे सरकार नापास झाले आहे. आता नापास सरकारला पुन्हा सत्तेत प्रवेश देउ नका असे स्पष्ट केले.

पैठणला विकास कामात या सरकारने दुजाभाव केला आहे पैठणहुन जाणारा रेल्वे मार्ग, चारपदरी रस्ता या दळभद्री सरकारने पळविला आहे आणि पैठणकरांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. म्हणून आता २०१९ च्या निवडणुकीत या फसव्या आणि चकवा देणार्या सरकारला आपली जागा दाखवून द्यावी असे आवाहन चव्हाण यांनी केले.

 

Sponsored Ads

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.