InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

रमेश भाटकर यांच्या निधनामुळे चतुरस्त्र अभिनेता हरपला- अशोक चव्हाण

ज्येष्ठ अभिनेते रमेश भाटकर यांच्या निधनामुळे मराठी नाट्य-सिनेसृष्टीतील चतुरस्त्र अभिनेता हरपला, या शब्दात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी शोकभावना व्यक्त केल्या आहेत.

रमेश भाटकर यांच्या निधनावर दु:ख व्यक्त करताना खा. चव्हाण म्हणाले की, भाटकर यांनी तीन दशकांहून अधिक काळ आपल्या सहज सुंदर अभिनयाने रंगभूमी, दूरचित्रवाणी आणि सिनेसृष्टी गाजवली. टीव्ही मालिकांमधील त्यांच्या इन्स्पेक्टरच्या भूमिका विशेष लोकप्रिय ठरल्या होत्या. ‘हॅलो इन्स्पेक्टर’, ‘दामिनी’ या त्यांनी अभिनय केलेल्या मालिका प्रचंड लोकप्रिय राहिल्या आहेत. त्यांच्या ‘माहेरची साडी’ या चित्रपटाने मराठी चित्रपटसृष्टीत अनेक नवे विक्रम प्रस्थापित केले. रमेश भाटकर यांनी साकारलेल्या धाडसी पोलीस अधिका-यांच्या भूमिका मराठी रसिकांच्या कायम स्मरणात राहतील.

रमेश भाटकर यांना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply