Ashok Gehlot | मुख्यमंत्र्यांनी वाचला जुनाच अर्थसंकल्प; सभागृहात उडाला मोठा गोंधळ

Ashok Gehlot | नवी दिल्ली : राजस्थान सरकारसाठी लोकसभा सभागृहामध्ये आज अत्यंत महत्वाचा आणि आव्हानात्मक दिवस होता. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी निवडणुकीचा अर्थसंकल्प सादर करताना मोठा घोळ घातला आहे. मुख्यमंत्री गेहलोत यांनी गेल्या वर्षीचा अर्थसंकल्प सादर केल्याने विरोधकांनी सभागृहामध्ये गदारोळ केल्याचे पहायला मिळाले. मात्र, मंत्री महेश जोशी यांनी त्यांना मध्येच रोखलं. या प्रकरानंतर सभागृहात प्रचंड गदारोळ झाला. यानंतर सभागृहाचं कामकाज तहकूब करण्यात आले.

मुख्यमंत्री गेहलोत विधानसभेत अर्थसंकल्प सादर करत असताना विरोधी पक्षनेत्यांनी गदारोळ सुरु केला. यावेळी अशोक गेहलोत यांनी थोडा धीर धरा असंही सांगितलं. मात्र, मंत्री महेश जोशी म्हणाले की, “तुमच्याकडे सर्वांचं लक्ष आहे. हे चुकीचं आहे.”

मुख्यमंत्र्यांनी वाचला जुना अर्थसंकल्प (CM Ashok Gehlot read the old budget)

विधानसभेत विरोधी पक्षाकडून आक्रमक पहायला मिळाली. त्यानंतर विधानसभेत मोठा गदारोळ झाला. असं सांगितलं जातंय की, “अशोक गेहलोत ज्यावेळी बजेट सादर करत होते, त्यावेळी त्यांनी मागील तीन ते चार योजनाही वाचल्या. यामध्ये नगरविकास आराखड्यातील गेल्यावर्षीच्या योजनांचाही समावेश होता. तेव्हा पाणीपुरवठा मंत्री महेश जोशी यांनी मुख्यमंत्री गेहलोत यांच्या कानात सांगितलं. त्यानंतर ते सॉरी म्हणाले. मात्र यानंतर विरोधकांनी सभागृहात प्रचंड गदारोळ सुरु केला.”, असंही सांगण्यात आलं आहे.

विरोधकांचा सभागृहात गदारोळ 

विरोधकांच्या गदारोळात विधानसभा अध्यक्षांनी मी सभागृह सोडणार असल्याचं सांगितलं. मात्र हा गदारोळ पाहून राजस्थान विधानसभेचं कामकाज 30 मिनिटांसाठी तहकूब करण्यात आलं. मुख्यमंत्री अशोक गेहलोत म्हणाले की, “इंदिरा गांधी शहरी रोजगार हमी योजना जाहीर केली आहे. याअंतर्गत शहरात राहणाऱ्या लोकांना 100 दिवसांचा रोजगार मिळणार आहे. यासाठी दरवर्षी 800 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.” यादरम्यान त्यांनी एक शेरही वाचला. त्याचवेळी पाणीपुरवठा मंत्र्यांनी त्यांना मध्येच रोखलं. कारण अर्थसंकल्पात मुख्यमंत्री ज्या घोषणा वाचून दाखवत होते, त्या घोषणा गेल्या वर्षी लागू झालेल्या होत्या.

विरोधकांकडून टीकेची झोड

केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी याप्रकरणी एक ट्वीट केलं. “पेपर लीकनंतर राजस्थानचं बजेटही लीक. गहलोतजी एक कॉपी तर तुमच्याकडे ठेवायची, जुनं बजेट वाचायची वेळच आली नसती.”, असे गजेंद्र सिंह शेखावत यांनी अशोक गेहलोत यांचा व्हिडीओ ट्विटरवर शेअर करत टीका केली आहे.

महत्वाच्या बातम्या-

You might also like

Comments are closed.