अफगाणिस्तान सोडून पळालेल्या अश्रफ घनींना तालिबानकडून खास ऑफर, घनी स्वीकारणार?

तालिबानी बंडखोरांनी अफगाणिस्तानच्या सर्वच प्रमुख शहरांचा ताबा मिळविल्यानंतर अखेर राजधानी काबुलमध्ये ही आपली सत्ता प्रस्थापित केली आहे. तालिबानी बंडखोरांसमोर अफगाणिस्तान सरकारने गुडघे टेकले असून अध्यक्ष अशरफ घनी यांना देश सोडून जावं लागलं होत. देशाला होणाऱ्या रक्तपातापासून वाचण्यासाठी आपण देश सोडला.असं त्यांनी सांगितलं होत.

मात्र आता उपराष्ट्रपती अमरूल्लाह सालेह हे पंचशीर प्रांतात आहेत. तेथून ते तालिबान विरोधात आपली मोहिम राबवत आहेत. राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी आणि उपराष्ट्रपती रहे अमरुल्लाह सालेह यांना एक ऑफर दिलीय. तालिबानने या दोन्ही नेत्यांसंदर्भात सामंजस्याची भूमिका घेतलीय. तसेच या दोन्ही नेत्यांना अफगाणिस्तानमध्ये परतायचं असल्यास ते परत येऊ शकतात असंही तालिबानचे नेते खलील उर रहमान हक्कानी यांनी म्हटलं आहे.

तालिबान मानवतेचा पुजारी असल्यासारखं त्यांचे दहशतवादी बोलत आहेत. अशरफ घनी, अमरुल्लाह सालेह आणि हमदुल्लाह मोहिब यांना तालिबानने माफ केलं आहे असंही हक्कानी यांनी सांगितलं. हक्कानी यांनी आम्ही सर्वांना माफी दिल्याचं म्हटलं आहे. यामध्ये आतापर्यंत तालिबानविरोधात लढणारे सैनिक, अफगाणिस्तानमधील तालिबानला यापूर्वी विरोध करणारे नागरिक या आम्ही सर्वांनाचं माफ केलं आहे, असंही हक्कानी यावेळी म्हणाला आहे.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा