Ashwini Jagtap | “गड आला पण सिंह गेला”; कलाटेंच्या बंडखोरीचा अश्विनी जगताप यांना फायदा?

Ashwini Jagtap | पुणे : पुण्यात कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपला पराभवाचा मोठा फटका बसला आहे. तब्बल 28 वर्षांचा गड भाजपला राखता आला नसल्याचं सर्वत्र बोललं जात आहे. महाविकास आघाडीच्या रवींद्र धंगेकरांनी भाजपचा गड भेदला आहे. तर दुसरीकडे चिंचवडमध्ये भाजपला अपेक्षित असं यश मिळालं आहे.

दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना भाजपने पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी दिली होती. ही निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात पाहायला मिळाली. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस निवडणूक लढवण्यावर ठाम असल्यामुळे निवडणूक पार पडली.

राहुल कलाटेंच्या बंडखोरीचा

पिंपरी चिंचवडमध्ये भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप यांनी ३६,०९१ मताधिक्याने विजय मिळवला. त्यांना ३७ व्या फेरीअखेर एकूण १ लाख ३५ हजार ४३४ मतं मिळाली. दुसरीकडे महाविकासआघाडीचे उमेदवार नाना काटे यांना ९९ हजार ३४३ मतं मिळाली. विशेष म्हणजे शिवसेनेचे बंडखोर नेते राहुल कलाटे यांनी अपक्ष म्हणून उमेदवार होते त्यांना ४४ हजार ८२ मतं मिळाली आहेत.

कलाटेंच्या बंडखोरीचा भाजपला फायदा

राहुल कलाटेंच्या बंडखोरीचा भाजपला फायदा झाल्याची चर्चा आहे. याबाबत पत्रकारांनी विचारलं असता अश्विनी जगताप यांनी एका वाक्यात उत्तर दिलं. राहुल कलाटेंच्या बंडखोरीचा फायदा झाला का? असा प्रश्न विचारला असता अश्विनी जगताप म्हणाल्या, “नक्कीच, राहुल कलाटेंच्या बंडखोरीचा मला फायदा झाला.”

“गड आला पण सिंह गेला” (Ashwini Jagtap’s reaction after victory in Chinchwad)

पिंपरी चिंचवड पोटनिवडणुकीवर बोलताना अश्विनी जगताप म्हणाल्या, “ही निवडणूक माझ्यासाठी खूप महत्त्वाची होती. गड आला, पण सिंह गेला. लक्ष्मण जगताप यांचं निधन झालं, त्यामुळे आम्हा सर्वांना त्यांचा गड राखायचा होता. तो गड सर्वांनी राखला आहे.”

“माझा सुरुवातीपासून सर्वांवर विश्वास होता. मी हा विजय लक्ष्मण जगताप आणि सर्व सामान्य नागरिकांना समर्पित करते. माझे वरिष्ठ नेते जेव्हा सांगतील तेव्हा मी अधिवेशनालाही येणार आहे. मी सर्वसामान्यांचा आमदार म्हणून काम करेन. सर्वांसाठी आमचे दरवाजे खुले असतील,” असं देखील अश्विनी जगताप म्हणाल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या-

You might also like

Comments are closed.