Asia Cup 2022 : आशिया चषकात भारताच्या सलामी जोडीबाबत अजुनही प्रश्नचिन्ह, माजी क्रिकेटपटू म्हणाला…!

मुंबई : भारताचा माजी क्रिकेटपटू आकाश चोप्राने आशिया चषकात संघाच्या सलामी जोडीबाबत मोठी प्रतिक्रिया दिली आहे. आशिया चषकामध्ये रोहित सोबत कोण सलामी करणार हा टीम इंडियासमोर सर्वात मोठा प्रश्न असल्याचं त्याने म्हटलं आहे. भारतीय संघाने अलीकडे अनेक सलामीवीरांना आजमावले आहे. ऋषभ पंतने इंग्लंड मालिकेत सलामी दिली होती. तर सूर्यकुमार यादव वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-२० मालिकेत सलग डावाची सुरुवात करत आहे. यापूर्वी इशान किशननेही अनेक डावात भारतासाठी सलामी दिली होती.

आकाश चोप्राच्या मते, आशिया कपमध्ये भारतासमोर सर्वात मोठा प्रश्न असेल की ते कोणासोबत सलामी देतात. तो त्याच्या यूट्यूब चॅनलवर एका संवादादरम्यान म्हणाला की, ‘ भारतासाठी आशिया चषकात सर्वात मोठा प्रश्न हा आहे की सलामीवीर कोण असेल? केएल राहुल देखील आता नक्कीच उपलब्ध राहणार आहे. त्यामुळे केएल राहुल ओपनिंग करेल की सूर्यकुमार यादव ओपन करेल की इशान किशनला संधी मिळेल? विराट कोहली रोहित शर्मासोबत ओपन करू शकतो का? या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला आशिया कपदरम्यानच मिळतील. कारण जो संघ आशिया चषक स्पर्धेत खेळणार आहे. तोच संघ टी-२० विश्वचषकाचाही भाग असणार आहे. यामध्ये कुणाला दुखापत नसेल तर संघात कोणताही बदल होणार नाही.

आशिया कप २०२२ चे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. या स्पर्धेतील पहिला सामना २७ ऑगस्ट रोजी श्रीलंका आणि अफगाणिस्तान यांच्यात होणार आहे. यानंतर २८ ऑगस्ट रोजी दुबईतच भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना होणार आहे. स्पर्धेचा अंतिम सामना ११ सप्टेंबर रोजी होणार आहे. साखळी टप्प्यानंतर ही स्पर्धा सुपर फोरमध्ये जाईल आणि नंतर अव्वल संघांमध्ये अंतिम सामना खेळवला जाईल. भारत आणि पाकिस्तान संघांना या स्पर्धेचा प्रमुख दावेदार मानले जात आहे. त्याचबरोबर पाकिस्तान आणि भारत हे एक-दोन नव्हे तर तीन वेळा आमने-सामने येण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.

महत्वाच्या बातम्या :

महत्वाच्या बातम्या

Comments are closed.