Asia Cup 2022 : आशिया चषकात भारताविरुद्ध लढण्यासाठी पाकिस्तान क्रिकेट संघाची घोषणा; ‘असा’ आहे संघ!

मुंबई : ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस होणाऱ्या आशिया चषकासाठी पाकिस्तानने आपला संघ जाहीर केला आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने बुधवारी त्यांच्या १५ सदस्यीय संघाच्या नावाची घोषणा केली आहे. २७ ऑगस्ट ते ११ सप्टेंबरपर्यंत चालणारी आशिया चषक स्पर्धा यूएईमध्ये आयोजित केली जाणार आहे. मात्र या स्पर्धेचे यजमानपद हे पूर्वनियोजित प्रमाणे श्रीलंकेकडेच असणार आहे. क्रिकेट इतिहासातली सर्वात मोठी लढत क्रिकेट चाहत्यांना पाहायला मिळणार आहे. कारण २८ ऑगस्टला आशिया चषकात पाकिस्तानचा सामना भारताशी होणार आहे.

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने नेदरलँडसह आयसीसी विश्वचषक सुपर लीग आणि आशिया चषक स्पर्धेसाठी आपला संघ जाहीर केला. १६ ते २१ ऑगस्ट दरम्यान नेदरलँड्सविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या वनडे आणि आशिया चषक टी-२० साठी खेळाडूंच्या नावांची घोषणा करण्यात आली. या दोन्ही संघांमध्ये हसन अलीच्या जागी वेगवान गोलंदाज नसीम शाहची निवड करण्यात आली आहे. २०२१ मध्ये एकदिवसीय मालिकेसाठी इंग्लंड दौऱ्यावर गेलेला सलमान अली संघात परतला आहे. शाहीन आफ्रिदीला एकदिवसीय आणि टी-२० या दोन्ही संघात स्थान मिळवण्यात यश आले आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने अब्दुल्ला शफीद, इमाम-उल-हक, मोहम्मद हारिस, सलमान अली, झाहिद मेहबूब यांच्या जागी आसिफ अली, हैदर अली, इफ्तिखार अहमद आणि उस्मान कादिर यांचा नेदरलँड विरुद्ध वनडे आणि आशिया कप टी-२० संघात समावेश केला आहे.

आशिया चषकासाठी पाकिस्तान संघ
बाबर आझम (कर्णधार), शादाब खान (उपकर्णधार), आसिफ अली, फखर जमान, हैदर अली, हॅरिस रौफ, इफ्तिखार अहमद, खुर्शीद शाह, मोहम्मद रिझवान, मोहम्मद नवाज, मोहम्मद वसीम जूनियर, नसीम शाह, शाहीन शाह आफ्रिदी, शाहनवाज डहानी, उस्मान कादिर.

नेदरलँड विरुद्ध एकदिवसीय संघ
बाबर आझम (कर्णधार), शादाब खान (उपकर्णधार), अब्दुल्ला शफीक, फखर जमान, हॅरिस रौफ, इमाम-उल-हक, खुर्शीद शाह, मोहम्मद हारिस, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिझवान, मोहम्मद वसीम जूनियर, नसीम शाह, सलमान अली , शाहीन शाह आफ्रिदी, शाहनवाज डहानी, जाहिद महमूद.

महत्वाच्या बातम्या :

महत्वाच्या बातम्या

Comments are closed.