InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

आशियाई कुस्ती स्पर्धेत भारतची समाधानकारक कामगिरी

आशियाई कुस्ती स्पर्धेत पहिल्याच दिवशी उल्लेखनीय कामगिरी करत भारताच्या हरप्रीत सिंगने सलग दुसऱ्यांदा कांस्यपदक कमावले. ग्रीको रोमन विभागात ८० किलो वजनी गटात चीनच्या जुनजेई ना याला ३-२ ने पराभूत केले. नवी दिल्ली येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत भारताला पुरुषांच्या लढतीत म्हणावेसे यश नाही मिळाले पण हरप्रीतच्या पदकाने त्याची कसर भरून काढली.

पहिल्या फेरीत  १-१ अशी बरोबरी होती. तर दुसऱ्या फेरीत हरप्रीत सिंगने आपले कौशल्य दाखवून आघाडी  मिळवली व ती शेवट पर्यंत टिकून ठेवली. परंतु   शेवटच्या ३० सेकंदात चिनच्या मल्लाने गुण मिळवत २-२ अशी बरोबरी केली. आणि या खेळात रंगत वाढली. या ३० सेकंदामध्ये लढतीत हरप्रीतने वाखण्याजोगी खेळी करत बाजी मारली आणि भारतासाठी दिवसातले पहिले पदक पटकावले.

गुरप्रीत सोबतच भारताचे बाकी मल्लांना अपयश आले. ग्रीको रोमन विभागात ८० किलो वजनी गटात गुरप्रीतने सुरवातीला जपानच्या युया माईतावर २-१ ने मात केली. मात्र नंतरच्या फेरीत दक्षिण कोरियाच्या जुआन हुयांग किमने ८-० ने त्याचा पराभव केला. किमने या फेरीत अंतिम फेरी गाठली, आणि गुरप्रीतला रेपिएज फेरीत स्थान मिळाले.

रेपिएज फेरीत चीनच्या बिन यांग याने केवळ ३८ सेकंदात ८-० गुणांची खेळी करत गुरप्रीतचे आव्हान संपुष्ठात आणले. भारताचे मल्ल रविंदर(६६ किलो ), हरदीप (९८ किलो ), व नवीन कुमार(१३०) यांचे आव्हान देखील संपुष्ठात आले .

“आशियायी स्पर्धेत पदक मिळवण्याचा मला आत्मविश्वास होता. मी या स्पर्धेसाठी खूप मेहनत घेतली होती. अन्य सहकारी पराभूत झाल्यामुळे माझ्यावर देशाच्या पदकाचे भवितव्य अवलंबून होते. साहजिकच माझ्यावर ते दडपण आलेले होते तरीही मी जिद्दीने लढलो. त्यामुळेच मी जिंकलो.” – हरप्रीत सिंग

 

Sponsored Ads

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.