ASR | MPL – दिग्विजय, एन्ड्युरन्स उपांत्य फेरीत
ASR | MPL औरंगाबाद : एएसआर-एमपीएल क्रिकेट स्पर्धेत गुरुवारी (ता. ९) झालेल्या उपउपांत्य सामन्यात दिग्विजय मार्व्हल्स संघाने सन्मान स्मॅशर्सवर चार धावांनी तर, एन्ड्युरन्स एन्चॅन्टर्स संघाने किर्दक चार्जर्स संघावर चार गडी राखून विजय मिळवला. दोन्ही विजयी संघांनी उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला आहे. दिग्विजयचे कर्णधार तथा जीएसटी आयुक्त जी. श्रीकांत यांनी ३१ धावा करत दोन गडी बाद केल्याने सामनावीराचा पुरस्कार मिळाला.
दिग्विजय मार्व्हल्सकडून त्र्यंबक बहुरे यांनी १३ धावा, जी श्रीकांत ३१, राहुल आमले २०, संतोष महेर १४, गणेश शिरसवाड यांनी १२ धावा केल्या. सन्मान स्मॅशर्सच्या वासिम शेख आणि दुर्गेश देशपांडे यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. दिग्विजय संघाने निर्धारीत २० षटकात नऊबाद १२२ धावा काढल्या. प्रत्युत्तरात सन्मान स्मॅशर्सचा संघ निर्धारीत षटकात सात बाद ११८ धावा करू शकला. संतोष इंगळे यांनी ४६, अनुप २०, प्रतिक पालोद १३, अमोल भालेराव यांनी १२ धावांचे योगदान दिले. शेवटच्या षटकात सन्मान संघाला सहा धावांची गरज असताना दिग्विजयच्या राहुल आमले यांनी ते षटक टाकले. अवघ्या दोन धावा देत दोन गडी बाद केले. सामना जिंकल्यानंतर जी श्रीकांत यांनी आमले यांना उचलून घेत आनंद साजरा केला. दिग्विजय संघाने चार धावांनी विजय मिळवला.
दुसऱ्या सामन्यात किर्दक चार्जर्सने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात नऊबाद १२० धावा केल्या. यात बाळासाहेब मगर १७, विजय नरवडे १३, प्रदीप चव्हाण १०, योगेश जाधव यांनी २० धावा केल्या. एन्ड्युरन्स एन्चॅन्टर्सच्या आशिष वर्दे यांनी तीन गडी बाद केले. फलंदजीस आल्यानंतरही आशिष यांनी २४ धावांची खेळी केली. त्यानंतर सचिन पानसे यांनी ३२ चेंडूत ४२ तर, शरद टाक यांनी ३९ चेंडूत ४३ धावा काढल्याने संघाला १८.४ षटकात १२३ धावांपर्यंत मजल मारली. सचिन आणि शरद यांच्या नाबाद खेळीने एन्ड्युरन्स संघाने सहज विजय मिळवला.
महत्वाच्या बातम्या-
- Nagpur Test । नागपूर कसोटी : पॅट कमिन्सचा फलंदाजीचा निर्णय; ऑस्ट्रेलिया १४८ वर ५ विकेट
- Diabetes | डायबिटीसच्या रुग्णांनी नाश्त्यात करावे ‘या’ पदार्थांचे सेवन, मिळतील अनोखे फायदे
- Indian Navy Recruitment | तरुणांनो लक्ष द्या! भारतीय नौदलात ‘या’ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू
- Ajit Pawar | “…म्हणून अखेरच्या दिवशी नाना काटेंना उमेदवारी”; अजित पवारांनी सांगितलं उमेदवारीचं राजकारण
- Narendra Modi | “वो अब चल चुके है, वो अब आ रहे है”; भर लोकसभेत पंतप्रधान मोदींची राहुल गांधींवर टीका
Comments are closed.