InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

आसाममध्ये पुराचे थैमान; साडे चार लाख लोकांना फटका

 

साममध्ये पुराने थैमान घातल्याने तब्बल साडे चार लोकांना फटका बसला आहे. आसाममधील १७ जिल्ह्यांना पुराच्या पाण्याने वेढा दिला आहे. अनेक जिल्ह्यांमधील नद्या धोक्याच्या पातळीवरून वाहू लागल्या आहेत.

आसामच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिलेल्या माहितीनुसार गोलाघाट, धेमाजी आणि कामरुपमध्ये तीन जणांचा पुरामुळे मृत्यू झाला आहे. या तीन जिल्ह्यांबरोबरच लखीमपूर, बिस्वानाथ,दरँग, बारपेटा, नलबारी, चिरांग, गोलाघाट, मजूली, जोरहाट, दिबरूगड, नागाव, मोरीगाव, कोक्राझार, बोंगाईगाव, बकसा आणि सोनीतपूर जिल्ह्यांना मोठा फटका बसला आहे.

बारपेटा जिल्ह्याला पुराचा सर्वांधिक फटका बसला आहे. या जिल्ह्यातील ८२ हजार  २६२ लोकांना फटका बसला आहे. धेमजीमध्येही जवळपास तशीच परिस्थिती असून ८० हजार २१९ लोक प्रभावित झाले आहेत.

मुसळधार पावसामुळे आतापर्यंत  ७४९ खेडी तसेच ४१ महसूल विभाग पाण्याखाली गेले आहेत. जवळपास दोन हजार लोकांची छावण्यांमध्ये सोय करण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या-

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply