InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

विधानसभेत राज ठाकरे यांच्याबरोबर आघाडी नाहीच, काँग्रेस नेत्याने केले स्पष्ट

राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेबरोबर आघाडी करणार नसल्याचे, काँग्रेस प्रवक्ते अभिषेक मनु सिंघवी यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केले आहे.

सिंद्धांत अंतर असल्यामुळे राज ठाकरेंबरोबर कोणतीही आघाडी करणार नाही. राष्ट्रवादीकडून देखील मनसेबरोबर आघाडी करा, असे आम्हाला सांगण्यात आले आहे. मात्र आम्ही युती करणार नाही. असे सिंघवी म्हणाले आहेत.

तसेच शिवसेनेशी देखील आमचे विचार जुळत नसल्याने त्यांच्याशी युती करण्याचा प्रश्नच नाही, असेही सिंघवी म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply