राज्यात येत्या ऑक्टोबरमध्ये विधानसभा निवडणुका होतील-गिरीश महाजन

राज्यात येत्या ऑक्टोबरमध्ये होतील. सप्टेंबरमध्ये आदर्श आचारसंहिता लागू शकते, असे भाकित फडणवीस सरकारमधील संकटमोचन समजले जाणारे जलसंपदामंत्री यांनी वर्तवले आहे. नाशिक येथे रविवारी (14 जुलै) झालेल्या नियोजन बैठकीत यांनी सर्वांचेच लक्ष लागलेल्या निवडणुकीसंदर्भात हे भाकित वर्तवले आहे.

लोकसभा निवडणुकीमुळे होऊ न शकलेली जिल्हा नियोजन समितीची बैठक पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी दुपारी एक वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन हॉलचे नूतनीकरण करण्यात आले असून, त्याचे उद्घाटन पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते करण्यात आले. 10 किंवा 13 ऑक्टोबरला राज्यात विधानसभा निवडणुका होतील. तसेच 10 किंवा 15 सप्टेंबरला आदर्श आचारसंहिता लागू शकते, असे गिरीश महाजन यांनी यावेळी सांगितले.

महत्वाच्या बातम्या –

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.