InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

आसुसचा झेनफोन गो 5.0 एलटीई

आसुस झेनफोन गो 5.0 एलटीई (झेडीबी500केएल) हे मॉडेल ‘अमेझॉन इंडिया’सह ऑफलाईन पध्दतीतही उपलब्ध
करण्यात आले आहे. याची किंमत 8,999 रूपये एवढी आहे. आसुसने गेल्या वर्षी झेनफोन गो 5.0 एलटीई (टी500)
हे मॉडेल लाँच केले होते. आता याचीच पुढील आवृत्ती म्हणून हे मॉडेल सादर करण्यात आले आहे.
यात 5 इंच आकारमानाचा आणि 1280 बाय 720 पिक्सल्स म्हणजेच एचडी क्षमतेचा टिएफटी डिस्प्ले असेल. याची
रॅम 2 जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज 16 जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने 64 जीबीपर्यंत
वाढविण्याची सुविधा आहे. याशिवाय हा स्मार्टफोन खरेदी करणार्‍याला आसुसच्या ‘वेबस्टोअरेज’वर पाच जीबी इतकी मोफत स्पेस मिळणार आहे. यात 13 व 5 मेगापिक्सल्सचे कॅमेरे तर 2600 मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी असेल.

Sponsored Ads

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.