भर पत्रकार परिषदेत अनिल परब यांचा पडळकरांना टोला, म्हणाले…

मुंबई : एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण आणि सातवा वेतन आयोग लागू करण्यासाठी एसटी कामगारांनी सुरू केलेल्या संपावर आज तोडगा निघाला आहे. परिवहन मंत्री अनिल परब यांनी पत्रकार परिषतद घेऊन एसटी कामगारांच्या पगारवाढीची घोषणा केली. एसटीच्या इतिहासातील ही सर्वाधिक वाढ असल्याचं त्यांनी सांगितलं. अनिल परब यांनी आज पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली.

यावेळी मंत्री उदय सामंत, भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत उपस्थित होते. आम्ही सरकारतर्फे एक प्रस्ताव ठेवला. विलीनीकरणाचा निर्णय समितीने सरकारडे दिला तर तो मान्य असेल. पण तो निर्णय येईपर्यंत किंबहूना निर्णय होईपर्यंत तिढा असाच ठेवता येणार नाही. त्यामुळे सरकारने कामगारांच्या पगारात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. मुळ पगारात वाढ वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

अशातच या पत्रकार परिषदेत अनिल परब यांनी गोपीचंद पडळकरांना टोला लगावला आहे. गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांची भाषणं ऐकून कर्मचारी कंटाळलेत आहेत, असा टोला परब यांनी पडळकर आणि खोत यांना लगावला आहे. एसटीच्या इतिहासात कधीच अशी परिस्थिती निर्माण झाली नव्हती, असंही अनिल परब म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा