नीरज चोप्राच्या सन्मानात अॅथलेटिक्स महासंघाने घेतला ‘हा’ ऐतिहासिक निर्णय!

नवी दिल्ली : टोकियो ऑलिम्पिकमध्ये ऐतिहासिक कामगिरी बजावल्यानं सध्या नीरज चोप्रावर भरमसाठ कौतुकांचा वर्षाव होत आहे. अशातच आता भारतीय अॅथलेटिक्स महासंघानं नीरजचा मोठा सन्मान केला असल्याचं पाहायला मिळत आहे.

टोकियो ऑलिम्पिकच्या शेवटच्या दिवशी नीरजनं 7 ऑगस्टला भालाफेकमध्ये गोल्ड मिळवल्यानं यापुढे प्रत्येक वर्षी 7 ऑगस्ट हा ‘भालाफेक दिवस’ म्हणून साजरा करण्याचा मोठा निर्णय अॅथलेटिक्स महासंघाकडून घेण्यात आला आहे.

प्रत्येक वर्षी 7 ऑगस्टला भालाफेक दिवसानिमित्त देशभरात भालाफेक स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. महासंघाच्या योजना आयोगाचे अध्यक्ष ललित भनोट यांनी ही माहिती दिली आहे. ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक प्रकारात भारताला मिळालेले हे दुसरे सुवर्णपदक आहे. पहिलं 2008 मध्ये मिळालं होतं.

दरम्यान, टोकियो ऑलिम्पिकमध्ये यावर्षी भारताला एकूण 7 मेडल मिळाली. एका ऑलिम्पिकमध्ये एवढी मेडल मिळवण्याची भारताची ही पहिलीच वेळ आहे. नीरज चोप्रानं या घोषणेवर आनंद व्यक्त कर एएफआयचं धन्यवाद मानलं आहे.

महत्वाच्या बातम्या

 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा