“किरीट सोमय्यांवरील हल्ला महागात पडेल”, चंद्रकांत पाटलांचा इशारा

मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर पुणे महापालिकेच्या आवारात झालेल्या हल्ल्याप्रकरणी एकास सोमवारी अटक करण्यात आली होती. याप्रकरणात शिवसेनेच्या शहर प्रमुखांसह ६० ते ७० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आले आहेत. यानंतर या हल्ल्याची तक्रार किरीट सोमय्या आता राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे केली.

यानंतर सोमय्या म्हणाले होते कि, माझ्यावर हल्ला झाला. महापालिकेत गेल्यानंतर मला मारायचे, ठेचून काढायचा कट होता. तिथे शिवसेनेचे गुंड लपून बसले होते, असा आरोप सोमय्या यांनी केला आहे. तसेच हे सगळे कोणाच्या आदेशावरुन झाले, असा सवाल किरीट सोमय्या यांनी उपस्थित केला होता. सोमय्यांवरील या हल्ल्यानंतर आता भाजप आक्रमक झालं आहे.

माध्यमातून भाजप नेते आता सत्ताधाऱ्यांवर टीका करत आहेत. तसेच याप्रकरणी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहिले होते. तसेच किरीट सोमय्यांवरील हल्ला महागात पडेल, असा इशारा पाटील यांनी दिला आहे. मॉब लिचिंग करून किरीट सोमय्या यांना मारण्याचा प्लॅन होता, असा आरोप त्यांनी पत्रातून केला होता.

या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील यांनी ट्विट केले असून ट्विटमध्ये ते म्हणाले आहेत की,‘भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यावर शिवसैनिकांनी केलेल्या हल्ल्याच्या संदर्भात मी केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्याकडे तक्रार केली आहे.’ तसेच भाजप हा विषय कधीही सोडणार नाही, असेही पाटील म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा